Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : विधानसभेच्या मोठ्या लढतीमध्ये सध्या काय आहे स्थिती?

Assembly Election Results 2024 LIVE: महाराष्ट्रातील या दहा लढतीकडे देशभरातील नागरिकांचं लक्ष

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतीने अक्षरश: महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसचा संविधान बचावचा नारा फेल ठरल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीला लोकसभेचं यश काही महिनेसुद्धा टिकवता आलेलं नाही. धारावी प्रोजेक्ट संदर्भातले आक्षेप जनतेनं पूर्णपणे नाकारले आहेत. दुसरीकडे ठाकरेंचा गद्दारांचा मुद्दा विधानसभेत चालला नाही. नेहमी जो मराठा वर्ग शरद पवारांच्यासोबत असतो तो यावेळेस नाहीत. या निकालामुळे अजित पवारांच्या बंडावर जनतेचं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. 

नक्की वाचा - Election Results 2024: झारखंडमध्ये इंडिया आघाडी जोमात, मात्र सोरेन कुटुंबातील 3 सदस्य पिछाडीवर

राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काय सुरू आहे...

1 - अमित ठाकरे 12 हजार मतांनी पिछाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात महेश सावंत तब्बल सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर सदा सरवणकर यांना 16 हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. 

2 - वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे 37,588 मतांनी आघाडीवर आहे. येथून दुसऱ्या क्रमांकावर मिलिंद देवरा 33,736 आणि तिसऱ्या क्रमांकावर संदीप देशपांडे यांना 13,724 मतं मिळाली आहे.   

3 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. संगमनेर मतदारसंघात अमोल खटाल यांना 65 हजार मतं मिळाली आहेत. तर बाळासाहेब थोरात तब्बल 7 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.    

Advertisement

नक्की वाचा - महायुतीच्या जबरदस्त कामगिरीचं फडणवीसांकडून नेमक्या शब्दात वर्णन, म्हणाले...

4 -  छत्रपती संभाजीनगर पूर्वी मतदारसंघातून इम्तियाज जलिल तब्बल 38 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काही फेरींपूर्वी ते 50 हजार मतांनी आघाडीवर होते. 13 मतांच्या फेरीनंतर लीड कमी झाल्याचं दिसत आहे. त्याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अतुल सावे आहे. 

5 - कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. येथे भाजपचे अतुल भोसले यांना 64 हजार मतं मिळाली आहेत. 

6 - कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. येथे भाजपचे  अतुल भोसले यांना 64 हजार मतं मिळाली आहेत. 

Advertisement

7 - गडचिरोलातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम 3486 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांनी लेक पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

8 - बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार ६० हजार मतांनी आघाडीवर आहे. तर यगेंद्र पवार ६० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

9 - इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहे. हर्षवर्धन पाटील काही दिवसांपूर्वी भाजपमधून शरद पवार गटात सामील झाले होते. या मतदारसंघातून दत्तात्रय भरणे १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

Advertisement

10 - आंबेगाव मतदारसंघातून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील २५०० मतांनी आघाडीवर आहेत. येथे शरद पवार गटाचे उमेगवार देवदत्त निकम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

11 - अणुशक्ती नगरमधून अजित पवार गटाच्या सना मलिक विजयी झाल्या आहेत. येथून शरद पवार गटाचे फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला आहे. तर नवनिर्माण सेनेचे विद्याधर आचार्य यांना २८,३६२ मतं मिळाली आहेत.