जाहिरात
2 minutes ago
मुंबई:

भारतातील दोन प्रमुख राज्ये असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra Assembly Election 2024) आणि झारखंड (Jharkhand Assembly Election 2024) मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. दोन्ही राज्यांचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहेत.  महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागा असून सत्तास्थापनेसाठी एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला किमान 145 जागांची गरज आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण  81 जागा असून तिथे सत्तास्थापनेसाठी एका पक्षाला किंवा आघाडीला  किमान 41 जागांची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये (Election Results 2024) सगळ्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 66.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यात 68.95  टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपचे 105 आमदार विजयी झाले होते. त्याखालोखाल शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे 44 आमदार विजयी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळाले होते. 2022 साली शिवसेनेते फूट पडली. कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केली.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारही सत्तेत सामील झाले. या तीन पक्षांनी मिळून महायुती स्थापन केली. तर काँग्रेस शिवसेना(उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)  या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली होती. 

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन दिवशी मतदान झाले. झारखंडमध्ये इंडिया आघाडी विरूद्ध एनडीए यांच्यात प्रमुख लढत आहे. इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ति मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष यांचा समावेश आहे.  राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये आजसू, जेडीयू, एलजेपी या पक्षांचा समावेश आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये झामुमोला 30 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसने 16 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय जनता दल आणि सीपीएम या दोन पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. भाजपला गेल्या निवडणुकीत 25 जागा मिळाल्या होत्या.

Live Update : बारामतीत शरद पवार गटाला मोठा धक्का, अजित पवारांची मोठी आघाडी

बारामतीत शरद पवार गटाला मोठी धक्का, अजित पवारांची मोठी आघाडी

Live Update : आतापर्यंत कोल्हापूरचं चित्र काय आहे?

कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3834 मतांनी आघाडीवर 

राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 4389 आघाडीवर 

कागलमधून हसन मुश्रीफ 1777 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी)

इचलकरंजीमधून राहुल आवाडे 9425 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक 3209 मतांनी आघाडीवर 

शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 11000 मतांनी (चार फेरी)

शाहूवाडी सत्यजित पाटील 492 आघाडीवर (दुसरी फेरी)

चंदगडमधून शिवाजी पाटील 2097 मतांनी आघाडीवर 

करवीरमधून चंद्रदिप नरके 4500 मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)

हातकणंगलेमधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर

Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी 5300 मतांनी आघाडीवर...

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी 5300 मतांनी आघाडीवर...

Live Update : लातूर जिल्ह्यातील प्राथमिक कल काय आहेत?

लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात महायुती चे अभिमन्यू पवार आघाडीवर..

निलंगा विधानसभा मतदारसंघात महायुती चे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर..

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती घ्या डॉ.अर्चना पाटील चाकूरकर आघाडीवर....

उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुती चे संजय बनसोडे आघाडीवर..

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज्य शक्ती पक्षाचे गणेश हाके आघाडीवर 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार धिरज देशमुख आघाडीवर

Live Update : पुणे जिल्ह्यात महायुतीचा दबदबा

प्राथमिक कलात पुणे जिल्ह्यात महायुतीचा दबदबा  

पहिल्या दोन फेरीपर्यंत 21 पैकी 17 जागांवर महायुतीची आघाडी

Live Update : परंडा मतदारसंघ : आरोग्यमंत्री तानाजी सावंत पिछाडीवर

परंडा मतदारसंघ : आरोग्यमंत्री तानाजी सावंत पिछाडीवर, 

Live Update : उत्तर प्रदेशातील 9 जागांवरील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष 4 जागांवर आघाडीवर

उत्तर प्रदेशातील नऊ जागांवरील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष चार जागांवर आघाडीवर आहे. करहल, सीसामऊ, मीरापूर आणि फूलपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार आघाडीवर...

Live Update : कसब्यातून रवींद्र धंगेकर जागा काढणार? आतापर्यंत कितीची लीड?

कसब्यातून काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर २ हजार ७४९ मतांनी आघाडीवर 

दुसऱ्या फेरी नंतर ढंगेकर आघाडीवर

सातारा-जावली मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले १३ हजार मतांनी आघाडीवर

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके आघाडीवर

सचिन दोडके यांना ४७७६ मतं तर भीमराव तापकीर यांना ४१७१ मतं

सचिन दोडके हे महा विकास आघाडीचे उमेदवार

माण-खटाव मधून भाजपचे जयकुमार गोरे दुसऱ्या फेरीअखेर ८ हजार मतांनी आघाडीवर 

सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील 189 मतांनी आघाडीवर

माळशिरस विधानसभा ईव्हीएम मतमोजणी ची पहिली फेरी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर यांना 4170 मते तर भाजपाचे राम सातपुते यांना 4151 मते उत्तम जानकर 19 मतांनी आघाडीवर

कुडाळमधून वैभव नाईक दुसऱ्या फेरीत 129 मतांनी आघाडीवर






Live Update : लातूर शहरात अमित देशमुख 1500 मतांनी पिछाडीवर...

पुण्यात सुरुवातीच्या पहिल्या ट्रेंडमध्ये जवळपास सर्वच विद्यमान आमदार आघाडीवर 

लातूर शहरात अमित देशमुख 1500 मतांनी पिछाडीवर...

कोथरूड, कसबा, शिवाजीनगर वडगाव शेरी, पर्वती आणि हडपसर या सर्व मतदारसंघातून विद्यमान आमदारांची आघाडी 

चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे हे आघाडीवर

वडगाव शेरीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे आघाडीवर 

दुसऱ्या फेरीअंती सुनील टिंगरे आघाडीवर

सुनील टिंगरे यांना ६६९७ मतांनी आघाडीवर

बापू पठारे यांना ५२६३ मतांनी आघाडीवर

१४३४ मतांनी सुनील टिंगरे दुसऱ्या फेरीत आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे १०० मतांनी आघाडीवर

Live Update : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत 6080 मतांनी आघाडीवर

श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार अदिती तटकरे पहिल्या फेरीत 5275 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत 6080 मतांनी आघाडीवर

नितीन सावंत शिवसेना उबाठा 199 मतांची आघाडीवर

दुसऱ्या क्रमांकावर सुधाकर घारे अपक्ष उमेदवार आघाडीवर

तिसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आघाडीवर..

Live Update : पश्चिम बंगालच्या सर्व सहा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत TMC चे उमेदवार आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये सहा विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व सहा जागांवर टीएमसीचे उमेदवार आघाडीवर...

Live Update : घनसावंगीत पहिल्या फेरीत शिवसेनेचे शिंदे गट हिकमत उढाण 1531 मतांनी आघाडीवर, राजेश टोपे पिछाडीवर

वणी विधानसभा  महाविकास आघाडीचे शिवसेना (उभाठा)संजय देरकर 1000 मतांनी आघाडीवर

भंडाऱ्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सकोलीत 312 मतांनी आघाडीवर...

तुमसर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजू कारेमोरे EVM मतमोजणी 2085 मतांनी आघाडीवर

केळापूर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम 700 मतांनी आघाडीवर

बल्लारपूर  मतदार संघातून भाजप उमेदवार  सुधीर मुनगंटीवार ४१ मताने आघाडीवर

अमरावती मतदार संघातून महायुतीच्या सुलभा खोडके आघाडीवर

अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून प्रहार चे उमेदवार बच्चू कडू आघाडीवर 

मेळघाट मतदार संघातून प्रहारचे उमेदवार राजकुमार पटेल आघाडीवर..

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस 1889 मतांनी आघाडीवर

निलंगा विधानसभा- संभाजी पाटील निलंगेकर आघाडी, भाजपा 924 मतांनी आघाडीवर

केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे 248 मतांनी आघाडीवर

घनसावंगीत पहिल्या फेरीत शिवसेनेचे शिंदे गट हिकमत उढाण 1531 मतांनी आघाडीवर 

तर राजेश टोपे पिछाडीवर








Live Update : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने गाठली शंभरी...

Live Update : पुण्यातून कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर 550 मतांनी आघाडीवर..

पुण्यातून कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर 550 मतांनी आघाडीवर..

Live Update : पुण्यातील चार विद्यमान आमदार आघाडीवर

पहिल्या फेरीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांची 1500 मताची आघाडी

शिरोळ विधानसभा - राजेंद्र पाटील यड्रावकर 3 हजार मतांनी आघाडीवर 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा  - ऋतुराज पाटील 657 मतांनी आघाडीवर

करवीर विधानसभा  - राहुल पाटील 200 मतांनी आघाडीवर

हातकणंगले - अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर

चंदगड - अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर

इचलकरंजी - राहुल आवाडे 3 हजार मतांनी आघाडीवर

कागल - समरजित घाटगे आघाडीवरच

शाहूवाडी - विनय कोरे केवळ 20 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर आघाडीवर

राधानगरी - प्रकाश आबिटकर 1676 मतांनी आघाडीवर


पुण्यातील चार विद्यमान आमदार आघाडीवर 

चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील टिंगरे हे आघाडीवर 

कोथरूड मधून चंद्रकांत पाटील शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांची आघाडी 

वडगाव शेरी मधून पहिल्या पोस्ट मतांच्या फेरीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे आघाडीवर 

हडपसर मधून चेतन तुपे सुद्धा आघाडीवर

EVM च्या फेरीमध्ये कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आघाडीवर

Live Update : बारामती विधानसभेतील सर्वात मोठी बातमी, पहिले कल हाती

बारामती विधानसभा पहिली फेरीचे कल हाती...

अजित पवार - 9291

युगेंद्र पवार - 5668

अजित पवार 3623 पहिल्या फेरीत आघाडीवर

Live Update : ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे 4 हजार मतांनी आघाडीवर

ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

ठाणे शहर मधून संजय केळकर आघाडीवर

कळवा मुंब्रा - जितेंद्र आव्हाड आघाडीवर.

ओवळा माजिवडा मधून प्रताप सरनाईक आघाडीवर

Live Update : राज्यात सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ करवीरमधून काँग्रेसचा उमेदवार राहुल पाटील आघाडीवर

कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर 

राधानगरी मधून प्रकाश अबिटकर आघाडीवर 

कागलमधून समरजित घाटगे आघाडीवर 

इचलकरंजी मधून राहुल आवाडे आघाडीवर 

कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील आघाडीवर 

शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 

शाहूवाडी विनय आघाडीवर 

चंदगडमधून शिवाजी पाटील आघाडीवर 

करवीरमधून राहुल पाटील आघाडीवर

नालासोपारा मतदारसंघात भाजपचे राजन नाईक आघाडीवर

सावंतवाडी दीपक केसरकर आघाडीवर

सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघ करवीरमधून काँग्रेसचा उमेदवार राहुल पाटील आघाडीवर



Live Update : कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, जाणून घ्या एका क्लिकवर...

माण-खटाव मधून भाजपचे जयकुमार गोरे 3400 मतांनी आघाडीवर 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे पिछाडीवर

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांची आघाडी...

पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सत्यशिल शेरकर आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 300 मतांनी आघाडीवर

मान खटाव विधानसभा मतदारसंघ पोस्टल मतदानामध्ये जयकुमार गोरे यांनी घेतली 3000 मतांची आघाडी

अक्कलकोट विधानसभा मतदान पाहिला कल..

सचिन कल्याणशेट्टी - 2000 मतांनी आघाडीवर 

काँग्रेस सिद्धाराम म्हेत्रे पिछाडीवर

इंदापूर विधानसभेत पोस्टल मतमोजणीत हर्षवर्धन पाटील आघाडीवर 

इस्लामपूर पहिल्या फेरीत जयंत पाटील 619 मतांनी आघाडी

Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी 4000 मतांनी आघाडीवर

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी 4000 मतांनी आघाडीवर

Live Update : आताची मोठी बातमी! आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील पिछाडीवर

आताची मोठी बातमी! आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील पिछाडीवर

Live Update : पिंपरी मतदारसंघात पहिल्यात फेरीत अण्णा बनसोडेंना किती मतं मिळाली?

पिंपरी मतदारसंघात पहिल्यात फेरीत ११७२७ मतमोजणी

अण्णा बनसोडे - ७४८३

सुलक्षणा शिलवंत - ३१९५

Live Update : उत्तर पुण्यात काय आहे स्थिती?

उत्तर पुणे....

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर आघाडीवर

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप वळसे पाटील आघाडीवर

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून मविआ उबाठाचे बाबाजी काळे आघाडीवर

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार आघाडीवर

Live Update : कर्जत - टपाली मतदानात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आघाडीवर

कर्जत - टपाली मतदानात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आघाडीवर

Live Update : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत उदय सामंत 3500 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत उदय सामंत 3500 मतांनी आघाडीवर

Live Update : 14 टेबल पोस्टल मतदानामध्ये अपक्ष उमेदवार विजय चौघुले आघाडीवर

ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या ३२ फेऱ्या - 14 टेबल पोस्टल मतदानामध्ये अपक्ष उमेदवार विजय चौघुले आघाडीवर

Live Update : खामगाव मतदारसंघातून आकाश फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी

वसईमध्ये हितेंद्र ठाकूर आघाडीवर 

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर आघाडीवर 

पालघरमध्ये पोस्टल मतदानात राजेंद्र गावित आघाडीवर

बुलढाणा विधानसभा मतदार संघात संजय गायकवाड आघाडीवर

खामगाव मतदारसंघातून आकाश फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी 

Live Update : कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

Live Update : दक्षिण पश्चिम नागपूर भाजपचे देवेंद्र फडणवीस आघाडीवर

शंकर जगताप पोस्टल आघाडीवर 

राहुल कलाटे पिछाडीवर

उमरखेड विधानसभा पोस्टल मतमोजणीत भाजपचे किसन वानखेडे यांची आघाडी

नागपूर :

उत्तर नागपूर काँग्रेसचे डॉ नितीन राऊत पुढे

पूर्व नागपूर भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर

दक्षिण पश्चिम नागपूर  भाजपचे देवेंद्र फडणवीस आघाडीवर

Live Update : आतापर्यंतच्या कलानुसार, महायुती 44, मविआ 7!

धनंजय मुंडे आघाडीवर...

अक्कलकोटमधून काँग्रेसचे सीताराम मेहेत्रे आघाडीवर...

 

दक्षिण कोल्हापूरमधून ऋतूराज पाटील आघाडीवर

राधानगरीमधून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आघाडीवर 

शिरूरमधून शऱद पवार गटाचे अशोक पवार आघाडीवर..

Live Update :उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत - चंद्रकात पाटील

उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत - चंद्रकात पाटील

Live Update : झारखंडमध्ये काय आहेत आताचे कल?

झारखंड विधानसभेच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 
NDA 7, इंडिया 3 आघाडीवर...

Live Update : सोलापूर दक्षिणमधून पोस्टल मतमोजणीत सुभाष देशमुख आघाडीवर

सोलापूर ब्रेकिंग 

सोलापूर दक्षिणमधून पोस्टल मतमोजणीत सुभाष देशमुख आघाडीवर 

भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर तर ठाकरे गटाचे अमर पाटील पिछाडीवर

Live Update : साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर

सातारा

भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर 

शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम पिछाडीवर

Live Update : नाशिकच्या ओझर विमानतळावर खाजगी विमान तैनात

नाशिकच्या ओझर विमानतळावर खाजगी विमान तैनात 

- विमानतळावर निरमा ग्रुपचे विमान दाखल 

- 6 सीटर खाजगी विमान अहमदाबादहून नाशिक मध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती

- आमदारांना खाजगी ठिकाणी हलवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा

Live Update : कागलमधून समरजित घाटगे आघाडीवर...

कागलमधून समरजित घाटगे आघाडीवर...

Live Update : जालन्यातील घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर

जालना  पोस्टल मतमोजणी

जालन्यातील घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर

तर शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उढाण पिछाडीवर ....

जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आघाडीवर ...

भोकरदनमध्ये शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर...

बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे आघाडीवर ...

Live Update : पंढरपूरमध्ये भागिरथ भालके आघाडीवर

पंढरपूरमध्ये भागिरथ भालके आघाडीवर

Live Update : औरंगाबादमध्ये काय आहेत पहिल्या मतमोजणीचे कल?

औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर

औरंगाबाद पश्चिममधून शिंदेसेना संजय शिरसाट आघाडीवर

औरंगाबाद मध्यमधून शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर

सिल्लोडमधून शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर

गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर

पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे विलास भुमरे आघाडीवर

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण आघाडीवर

कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत आघाडीवर

Live Update : महायुती 5 आणि मविआ 1

Live Update : भाजपाचे उमेदवार मदन येरावार आघाडीवर

यवतमाळ : भाजपाचे उमेदवार मदन येरावार पोस्टल मतदानावर यवतमाळ मतदार संघातून आघाडीवर

Live Update : मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत कोण आघाडीवर?

मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत कोण आघाडीवर?

- किनवट भाजप भीमराव केराम 

- हदगाव काँग्रेस माधव पवार

- भोकर भाजप श्रीजया चव्हाण

- उत्तर उबठा संगीता डक

- दक्षिण अपक्ष दिलीप कंदकुर्ते

- लोहा घड्याळ प्रताप चिखलीकर

- नायगाव भाजप राजेश पवार

- देगलूर भाजप जितेश अंतापुरकर

- मुखेड  भाजप डॉ तुषार राठोड

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक

- भाजप संतुक हंबर्डे

Live Update : माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर आघाडीवर...

माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर आघाडीवर...

Live Update : पुढील अर्ध्या तासात मशीन मतमोजणीला सुरुवात होणार...

पुढील अर्ध्या तासात मशीन मतमोजणीला सुरुवात होणार...

Live Update : पोस्टल मतमोजणीला सुरुवात...

अवघ्या काही मिनिटात येईल पहिला कल, पोस्टल मतमोजणीला सुरुवात..

Live Update : दिल्लीच्या भाजप कार्यालयात जिलबी तयार करण्याचं काम सुरू

Live Update : काही क्षणांत पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार

काही क्षणांत पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार

Live Update : विधानसभा निवडणुकीचं मतमोजणी वेळापत्रक कसं असतं?

Live Update : मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी सिद्धीविनायकाच्या चरणी

Live Update : लोकसभेच्या तुलनेत महिलांचं मतदान 43 लाखांनी वाढलं...

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना, एसटी बससेवेच्या तिकीटात 50 टक्के सवलत याचा परिणाम असल्याचं पाहायला मिळतं.  लोकसभेला 2 कोटी 63 लाख 49 हजार 66 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेत तब्बल 3 कोटी 6 लाख 49 हजार 319 महिलांनी मतदानाचा हक्क हजावला. याचा अर्थ 43 लाख 253 महिलांचं मतदान वाढलं. 

Live Update : आदित्य ठाकरेंना वरळीचा गड राखता येणार?

सुरुवातीपासूनच मुंबई विधानसभा निवडणुकांमध्ये वरळी या विधानसभा मतदार संघाची चर्चा रंगली पाहिला मिळाली. आज उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  वरळी विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे. कर्मचारी देखील दाखल झाले आहेत. काही क्षणात मतदान मोजणी सुरू होईल

Live Update : मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यालयाबाहेरील दृश्यं

Live Update : मविआला किती जागा मिळण्याची शक्यता

शरद पवारांचा आघाडीला 157 जागा मिळण्याचा अंदाज

महाविकास आघाडीला 160 जागा मिळण्याचा ठाकरेंचा अंदाज

नाना पटोलेंना 150 ते 155 जागा मिळण्याचा विश्वास

काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत आघाडीला 158 जागा

15 राज्यातील 48 जागांवरील पोटनिवडणुकांचे आज निकाल, वायनाडच्या जागेवर सर्वांची नजर

आज 15 राज्यं आणि 48 विधानसभा, 2 लोकसभा जागांचे निकाल येणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह या जागांवरील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. उत्तर प्रदेशातील 9 जागांवर सर्वांची नजर आहे. याशिवाय वायनाड लोकसभा जागेवर काय निकाल लागणार याकडे सर्वांचं सर्वाधिक लक्ष असेल. याशिवाय राजस्थानात सात, पश्चिम बंगालमध्ये सहा, आसाममध्ये पाच आणि पंजाब-बिहारमध्ये चार-चार जागांवर पोटनिवडणुका झाल्या आहेत. कर्नाटक आणि केरळमध्ये तीन-तीन जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. 

Live Update : सर्वात मोठ्या दोन पक्षांकडून फाईव्ह स्टार हॉटेल्स बूक

महायुती आणि महाआघाडीत क्लोज फाईटची शक्यता

सर्वात मोठ्या दोन पक्षांकडून फाईव्ह स्टार हॉटेल्स बूक

नवोदीत आमदारांना सर्टिफिकेटसह तातडीनं मुंबई गाठण्याचे आदेश

नवोदीत आमदारांसाठी चार्टड फ्लाईटसही तयार

निकालानंतर फूट टाळण्यासाठी रिसॉर्टची तयारी

त्रिशंकू स्थितीत अपक्ष आमदारांशी आतापासूनच संपर्क

दोन्हींकडून अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्काची तयारी

सरकार स्थापनेसाठी 48 तास, त्यामुळे तातडीच्या योजना

Live Update : मुख्यमंत्री रविवारपर्यंतच ठरवला जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री रविवारपर्यंतच ठरवला जाण्याची शक्यता

सरकार स्थापनेसाठी फक्त 48 तास मिळणार

जिंकेल त्याच्यावर मुख्यमंत्री तातडीनं निवडण्याचा दबाव

सरकार स्थापनेसाठी कमी वेळ, त्यामुळे मुख्यमंत्री तातडीनं ठरवावा लागणार

Live Update : मुख्यमंत्री रविवारपर्यंतच ठरवला जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री रविवारपर्यंतच ठरवला जाण्याची शक्यता

सरकार स्थापनेसाठी फक्त 48 तास मिळणार

जिंकेल त्याच्यावर मुख्यमंत्री तातडीनं निवडण्याचा दबाव

सरकार स्थापनेसाठी कमी वेळ, त्यामुळे मुख्यमंत्री तातडीनं ठरवावा लागणार

Live Update : आज नांदेडच्या पोटनिवडणुकीचाही निकाल, काँग्रेसला सहानुभूती मिळणार की भाजप विजयाचं कमळ फुलवणार?

आज नांदेडच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात 26 ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. यंदा वसंतराव चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून डॉ. संतुकराव हंबर्डे रिंगणात आहेत. 

Live Update : आज नांदेडच्या पोटनिवडणुकीचाही निकाल, काँग्रेसला सहानुभूती मिळणार की भाजप विजयाचं कमळ फुलवणार?

आज नांदेडच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात 26 ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. यंदा वसंतराव चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून डॉ. संतुकराव हंबर्डे रिंगणात आहेत. 

Live Update : राज्यात यंदा किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला?

महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार
5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार
4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार
6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या  निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले

6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार 

मतदानात 3 कोटी 34 लाख  37 हजार 57 पुरूष
3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला
1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

Live Update : वायनाडच्या पोटनिवडणुकीचाही आज निकाल!

Live Update : NDTV मराठीवर Live पाहा विधानसभा निवडणुकीचा निकाल

Live Update : कोणाची येणार सत्ता? निकालाची इत्यंभूत माहिती NDTV मराठीवर...

Live Update : कधी, कुठे पाहणार निकाल? महत्त्वाचे मतदारसंघ, वाचा सर्व माहिती

Live Update : मतमोजणीला अवघी काही मिनिटं शिल्लक, मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्यं...

Live Update : कसं असतं मतमोजणीचं वेळापत्रक?

आजच्या मतमोजणीच्या वेळापत्रकाकडे एक नजर

पहाटे 5 वाजता.. मतमोजणी टेबल वितरण (allotment to counting officers)

सकाळी 6 ते 6.30.. अल्पोपहार, चहा.

सकाळी 6.30.. नेमून दिलेल्या टेबलावर स्थानापन्न होणे.

सकाळी 7.. गोपनीयतेची शपथ.

सकाळी 7 ते 7.30.. मतमोजणीच्या सहित्य तपासून घेणे.

सकाळी 7.30.. ई वी एम स्ट्राँग रूम उघडणे.

सकाळी 8.00
अ) ETBPS आणि पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीला आरंभ.. दोन टप्प्यांत होईल.. थोडक्यात आणि मग विस्तृत.. एकूण सुमारे तीन ते पाच तास चालण्याची शक्यता.

ब) पहिल्या फेरीच्या ई वी एम ची मुव्हमेंट 8.30 पर्यंत.

सकाळी 8.30 ईवीएम मतमोजणीला सुरुवात.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com