BMC election : मुंबईवर 'महिलाराज'? पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवार जास्त; कोणत्या प्रभागात सर्वाधिक संख्या?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

BMC election 2026 :  सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वारं वाहत आहे. १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल लागेल. देशातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसं पाहता सर्वच निवडणुकांमध्ये महिलांच्या सहभागाबाबत कमी-अधिक प्रमाणात उदासीनता दिसून येते. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

महिला उमेदवारांची संख्या किती?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १७०० उमेदवार आहेत. त्यात ८२१ पुरुष तर महिलांची संख्या ८७९ आहे. पालिकेच्या २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे सर्व जागांवर मिळून एकूण ८७९ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपच्या १३७ उमेदवारांपैकी ७६ महिला उमेदवारांची संख्या आहे. 

नक्की वाचा - Vasai-Virar Election 2026 : भाजप उमेदवारांकडून ओवाळणीतून मतदारांना पैसे वाटप? काँग्रेसच्या आरोपाने खळबळ

कोणत्या प्रभागात सर्वाधिक महिला उमेदवारांची संख्या?

देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी या भागात सर्वाधिक ६८ महिला उमेदवारांची संख्या असून सर्वात कमी महिला उमेदवार वरळी, प्रभादेवी परिसरात आहेत. 

देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी - ६८
वडाळा, दादरचे प्रभाग, शीव - ६६
धारावी, महिम, दादरजवळील काही भाग - ५९
अंधेरी पूर्व - ५६
घाटकोपर - ५१
भायखळा, चिंचपोकळी, रे रोड - ५०
अंधेरी पश्चिम - ४६
भांडुप - ४६
मालाड - ४२
मुलुंड - ३७
कुर्ला - ३५
वरळी, प्रभादेवी परिसर - ३४

Advertisement