Riteish Deshmukh Video: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडपे आहे. कॉमेडी, रोमँटिक यासह विविध विषयांवर हे कपल रील्स शेअर करत असतात. त्यांच्या गंमतीशीर व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचे प्रचंड मनोरंजन होते. याच कारणामुळे हे कपल चाहत्यांसाठी प्रत्येक वेळेस काही-न्-काही नवी गोष्टी घेऊन येत असतात. नुकतेच त्यांनी लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख - जिनिलियामध्ये वाद झाल्याचं दिसलं आणि तेही टोमॅटोमुळे.
थांबा थांबा मंडळींनो जास्त चिंता करू नका. देशमुख कपलमधील वाद खरेखुरे नाहीत तर हा व्हिडीओमध्ये विनोदी कंटेंट पाहायला मिळतोय.
रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ व्हायरल | Bollywood News| Riteish Deshmukh Genelia D'souza Video Viral
व्हिडीओमध्ये रितेशच्या हातात टोमॅटोची पिशवी दिसतेय. विकत आणलेले टोमॅटो तो पुन्हा करण्यासाठी जात असतो, यादरम्यान त्याची आणि जिनिलियाची धडक होते. जिनिलिया विचारते, 'कुठे जातोय?' रितेश म्हणतो- 'टोमॅटो आणले होते ते खराब निघाले, तेच बदलण्यासाठी जातोय'. यावर जिनिलिया म्हणते, 'पाहून आणायचे होते ना'. तिचा हा सल्ला ऐकून रितेश म्हणतो, 'तुला पण पाहूनच आणलं होतं'. रितेशने असं म्हणताच जिनिलिया मोठा आवासून त्याच्याकडे पाहते.
(नक्की वाचा: Shivali Parab Video : शिवाली परबचा तो व्हिडीओ पाहून रितेश देशमुखला लागलं वेड, म्हणाला...)
जिनिलियाने व्हिडीओला दिलं गंमतीशीर कॅप्शन
क्वॉलिटी चेक अतिशय गरजेचे आहे, असे कॅप्शन जिनिलियाने या गंमतीशीर व्हिडीओला दिलंय. चाहत्यांसह कपलच्या मित्रमैत्रिणींनीही व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका चाहत्याने कमेंट केलीय की, "खूपच गंमतीशर, काय केमिस्ट्री आहे". आणखी एकाने लिहिलंय की, "हे कपल खरंच एक नंबर आहे".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
