सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका

Sangli Lok Sabha : विशाल पाटील यांनी सांगलीतून 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजय मिळवला आहे. विशाल पाटील यांना येथे 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मते मिळाली.  

Advertisement
Read Time: 2 mins

सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीला आपल्या उमेदवाराच्या पराभवाचं दु:ख आहे. तर दुसरीकडे विशाल पाटील जिंकल्याचा आनंद देखील आहे. अपक्ष विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेससोबतच राहणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं असल्याने काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. 

(नक्की वाचा- 'बच्चा बडा हो गया...", बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला)

विशाल पाटील यांनी सांगलीतून 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजय मिळवला आहे. विशाल पाटील यांना येथे 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मते मिळाली.  तर चंद्रहार पाटील यांना जवळपास 60 हजार मते मिळाली.

विशाल पाटील यांनी विजयानंतर म्हटलं की, विश्वजीत कदम माझे नेते आहे. काँग्रेस जो काही निर्णय घेईल तो ते मला कळवतील. त्याप्रमाणे मी वागेल. उमेदवार जरी अपक्ष असला तरी तो महाविकास आघाडीच्या विचारांचा आहे, हे महत्वाचे आहे. 

Sangli News

(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)

पायलट, भरकटलेले विमान

काँग्रेसच्या एका मेळाव्यात विशाल पाटील यांनी आपले पायलट विश्वजीत कदम असल्याचं सांगितलं होतं. विशाल पाटलांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला होता. विमान भरकटलं असून पायलट विमानाला गुजरातला घेऊन जाणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर विशाल पाटलांनी विमान दिल्लीत उतरले आहे, असा पलटवार केला होता. विशाल पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे आज विमान खऱ्या अर्थाने दिल्लीला उतरले आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- उत्तर महाराष्ट्रात वारं फिरलं! महाविकास आघाडीची मोठी मुसंडी)

सांगलीत किती मतदान झालं होतं? 

  • जत विधानसभा मतदारसंघ - 60.76 टक्के
  • खाणापूर विधानसभा मतदारसंघ - 58.93 टक्के
  • मिरज विधानसभा मतदारसंघ - 64.79 टक्के
  • पळूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ - 62.35 टक्के
  • सांगली विधानसभा मतदारसंघ - 60.97 टक्के
  • तासगाव विधानसभा मतदारसंघ - 66.98 टक्के
Topics mentioned in this article