लोकसभा निवडणूक आत आटोपली आहे. प्रत्येक उमेदवार हे आता आपल्या मतदार संघातून मतदानाचा अंदाज घेत आहे. निकाल 4 जून ला लागणार आहे. त्या आधी उमेदवार हे अंदाज घेत आहेत. शिवाय कुणी आपले काम केले आणि कुणी विरोधात केले याचीही माहिती घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध भाजप असं चित्र दिसत आहे. इथले भाजपचे उमेदवार आणि मंत्री कपिल पाटील यांनी पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे भिवंडीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भिवंडी लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार आणि मंत्री कपिल पाटील यांना मैदानात उतरवले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवरी दिली होती. तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या मुळे ही लढत तिरंग झाली. या दोघांनीही कपील पाटील यांना तगडी लढत दिल्याची जोरदार चर्चा मतदार संघात आहे. शिवाय कपील पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी होती हे ही आता समोर आले आहे. त्यामुळे आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - आग, धूर आणि किंकाळ्या! 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12 मुलांचा समावेश; PM मोदींनी व्यक्त केला शोक
भिवंडी लोकसभेत आपल्याला मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे हे मताधिक्य देतील असे आपल्याला वाटते का? असा प्रश्न कपिल पाटील यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील भडकले. त्यांच्या मतदार संघातून कसे मताधिक्य मिळेल. त्यांच्या कार्यकर्त्यांनी खुले पणाने तुतारीचे काम केले आहे. काहींनी अपक्षाला मदत केली आहे. असा आरोप कथोरे यांचे नाव न घेता पाटील यांनी केला आहे. त्यांचे नाव घेवून त्यांना मोठे करायचे नाही. असेही ते म्हणाले. मात्र मुरबाड विधानसभेतून आपल्या विरोधात काम केल्याचा सुरू कपिल पाटील यांनी लावला आहे.
हेही वाचा - बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 बाळांचा मृत्यू, अनेक जखमी
शिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनीही कपिल पाटील यांच्या विरोधात काम केल्याची चर्चा आहे. त्यांचे कार्यकर्ते निलेश सांबरे यांचे काम करत होते असा आरोप होत आहे. लोकसभेला आपल्या विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. असा इशाराच यानंतर कपील पाटील यांनी दिला आहे. अजित पवार जसा करेक्ट कार्यक्रम करतात तसाच देवेंद्र फडणवीसही करत असतात. याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे असेही ते म्हणाले.