जाहिरात

Kerala Election: परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम! काँग्रेसच्या केरळ विजयाची Inside story

पण काँग्रेसने नायर समाजातील तीन मोठे चेहरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर ठेवल्याने भाजपची रणनीती अपयशी ठरली.

Kerala Election: परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम! काँग्रेसच्या केरळ विजयाची  Inside story

केरळच्या राजकारणात 10 वर्षांनंतर काँग्रेसने ऐतिहासिक पुनरागमन केले आहे. अंतर्गत कलह आणि गटबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसने यंदा अत्यंत शिस्तबद्ध रणनीती आखून डाव्या आघाडीचा (LDF) पराभव केला. राहुल गांधींची सक्रियता, तिकीट वाटपातील पारदर्शकता आणि प्रभावी सोशल इंजिनीअरिंग या जोरावर काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने (UDF) सत्ता काबीज केली आहे. सत्ता मिळवताना काँग्रेसने सत्तेतील 10 वर्षाची प्रतिक्षा संपवली आहे. 

नेत्यांमधील मतभेद मिटवले
निवडणुकीच्या सुरुवातीला शशी थरूर यांच्या भूमिकेबाबत साशंकता होती. मात्र, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः चर्चा करून थरूर यांना प्रचार समितीचे सह-संयोजक बनवले. त्यानंतर शरूर हे पक्षासाठी केरळात प्रचारासाठी फिरले होते. तसेच, खासदार सुधाकरन यांची नाराजी दूर करण्यासाठी ए.के. अँटनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे पक्षात एकजुटीचा संदेश गेला.

नक्की वाचा - Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत

नवी रणनीती आणि तरुण चेहरे
काँग्रेसने यंदा कोणत्याही खासदाराला विधानसभेच्या रिंगणात उतरवले नाही. मधुसूदन मिस्त्री यांच्या समितीने जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुणांना संधी दिली. एलडीएफच्या आमदारांविरुद्ध फारशी अँटी-इन्कम्बन्सी नसतानाही, काँग्रेसने आपल्या 25 लाखांच्या आरोग्य विम्याच्या हमीवर (Guarantee) भर दिला, ज्याचा मोठा फायदा झाला.

बंडखोरी रोखण्यास काँग्रेसला यश 
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह अनेक वेळा पाहायला भेटतो. मागिल निवडणुकी वेळी तेच झाले. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले होते. यावेळी मात्र काँग्रेसने बंडखोरी कशी होणार नाही याची विशेष काळजी घेतली. खासदार असलेल्या नेत्यांनी विधानसभेत तिकीट द्यायची नाही. नवे चेहरे द्यायचे अशी रणनिती काँग्रेसने आखली होती. त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शिवाय बंडखोर नेत्यांची समजूत घालण्यात आले. वेळी राहुल गांधी यांनी त्यांची भेट ही घेतली. त्यामुळे नाराजी शमली. 

नक्की वाचा - Tamil Nadu: तमिळनाडूत विजय यांची 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री! सत्तासंघर्षात TVK ची जोरदार मुसंडी

राहुल गांधींचा झंझावात
केरळमध्ये राहुल गांधी यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि भाजपमध्ये छुपी युती असल्याचा आरोप करत त्यांनी रान पेटवले. के.सी. वेणुगोपाल यांनी बंडखोर नेत्यांची मनधरणी करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणले. यामुळे मतदानापूर्वी काँग्रेस एक शिस्तबद्ध टीम म्हणून समोर आली.

धार्मिक आणि जातीय समीकरणे
काँग्रेसने मुस्लिम लीगसोबतच्या युतीमुळे मुस्लिम मते तर मिळवलीच, पण सनी जोसेफ यांना प्रदेशाध्यक्ष करून ख्रिश्चन मतदारांनाही साद घातली. तसेच के.सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला या नायर समाजाच्या नेत्यांमुळे भाजपच्या व्होट बँकवर काँग्रेसने डल्ला मारला. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकार सलग दोन वेळा सत्तेत राहिल्याने जनतेत काही प्रमाणात नाराजी होती. भाजपने नायर व्होट बँक खेचण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसने नायर समाजातील तीन मोठे चेहरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर ठेवल्याने भाजपची रणनीती अपयशी ठरली.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com