जाहिरात

Kerala News: केरळमध्ये आता एकही गरीब कुटुंब सापडणार नाही; 1 नोव्हेंबर रोजी होणार मोठी घोषणा

सरकारने दिलेले सहकार्य आणि मदत केरळ सरकारने या संपूर्ण उपक्रमावर 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना आणि मदत पुरवण्यात आली.

Kerala News: केरळमध्ये आता एकही गरीब कुटुंब सापडणार नाही; 1 नोव्हेंबर रोजी होणार मोठी घोषणा

केरळ राज्याच्या स्थापनेच्या दिनानिमित्त, 1 नोव्हेंबर रोजी, केरळ राज्याला 'अत्यंत गरीबी मुक्त राज्य' म्हणून घोषित केले जाणार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन ही ऐतिहासिक घोषणा करणार आहेत. या घोषणेमुळे केरळ देशातील एक महत्त्वाचे आणि आदर्श राज्य म्हणून ओळखले जाईल. मंत्री एम.बी. राजेश आणि व्ही. शिवनकुट्टी यांनी यासंबंधीची माहिती दिली.

कुटुंबश्री संस्थेद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्यात एकूण 64,006 अत्यंत गरीब कुटुंबे आढळली होती. त्यापैकी उर्वरित 59,727 कुटुंबे आता गरीबीतून बाहेर पडली आहेत. ही कुटुंबे विविध सरकारी योजना, आर्थिक सहाय्यता आणि सामाजिक समर्थनामुळे गरिबीमुक्त होऊ शकली आहेत.

(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

मुख्यमंत्री 1 नोव्हेंबर रोजी करणार घोषणा

मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याच्या या मोठ्या आणि महत्त्वाच्या उपलब्धीची घोषणा करतील. गरीबी निर्मूलनातील कुटुंबांकडे अन्न, आरोग्य, उपजीविका आणि निवास यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना 'अत्यंत गरीब' मानले जाते. या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने एक विशेष योजना तयार केली होती. सरकारी विभाग, स्वयंसेवक आणि सामान्य जनतेच्या मोठ्या प्रयत्नांमुळे ही कुटुंबे दारिद्र्यमुक्त झाली आहेत.

सरकारने दिलेले सहकार्य आणि मदत केरळ सरकारने या संपूर्ण उपक्रमावर 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना आणि मदत पुरवण्यात आली.

(नक्की वाचा -  Dhule News: दूध आहे की रबर! भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक VIDEO)

सरकारना गरीब कुटुंबांसाठी काय-काय केलं?

  • 21,263 लोकांना त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क दस्तऐवज मिळाले.
  • 2022 पासून 18,438 कुटुंबांना नियमितपणे खाद्य किट आणि 2,210 कुटुंबांना शिजवलेले जेवण मिळत आहे.
  • 29,427 कुटुंबांमधील 85,721 लोकांना अधिक चांगले उपचार आणि औषधे पुरवण्यात आली.
  • 4,394 कुटुंबांना उपजीविकेसाठी मदत देण्यात आली.
  • 'LIFE' गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 3,467 कुटुंबांना रोजगार हमी कार्ड देण्यात आले.
  • 2,791 कुटुंबांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली.
  • 660 कुटुंबांना घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये वाटप करण्यात आले.
  • 2,323 मुलांना आणि 554 विद्यार्थ्यांना केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com