विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. 1957 आणि 1977 च्या निवडणुकीत इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1998 पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं होतं. 1980 ते 1998 असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं.
1998 मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले. त्यानंतर 1999, 2004 ला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली. पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पक्षीय बलाबल
करवीर, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. कागल आणि चंदगड हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत. तर राधानगरी मतदासंघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे.
यंदाच्या निवडणुकीतील कळीचे मुद्दे
कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत घरामध्ये अनेक विषय चर्चा होते. राजघराणातील उमेदवारी वरून राजकारणात आरोप प्रत्यारोप केले जात होते. तसेच शाहू महाराज यांच्याबाबतीत वंशज हा कळीचा मुद्दा बनला. त्याचबरोबर विद्यमान खासदार संजय मंडलिक हे मतदार संघात फिरलेले नाहीत अशा चर्चा होत्या. पक्षातील बंडखोरी आणि महापुरात अडकलेल्या गावांना शाहू महाराजांनी केलेली मदत आणि कोल्हापूरचा विकास हे मुद्दे चर्चेत होते.
( नक्की वाचा : सांगलीच्या लोकसभा आखाड्यात 3 मातब्बरांची कुस्ती, कोण ठरणार विजेता? )
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा 23 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे नेते शाहू छत्रपती महाराज विरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक ही प्रमुख लढत आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये 70 टक्के मतदान झाले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडणार का? याकडंही सर्वांचं लक्ष असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world