'निधी देतोय तसं मशीनमध्ये कचा-कचा बटण दाबा', अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

इंदापूरमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement
Read Time2 min
'निधी देतोय तसं मशीनमध्ये कचा-कचा बटण दाबा', अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा
पुणे:

लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. नेत्यांच्या प्रचारसभा त्यांची वक्तव्ये, टीका, आश्वासने यांनी गाजत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील प्रचारसभेतील एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लागेल तो निधी आम्ही द्यायला तयार आहोत. तसं तुम्ही कचा-कचा मशीनमध्ये बटन दाबा, अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंदापूरमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थितांकडे निवडणुकीत सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, जेवढा निधी तुम्हाला हवा, तेवढा आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही निधी देतोय तसं मशीनमध्ये कचा-कचा बटण दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरे वाटेल, नाहीतर आमचा  आखडता येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

ठाण्याचा 'नायक' ठरला? शिंदेंचा जवळच्या नेत्या सिग्नल मिळाला?

अजित पवारांनी यावेळी आपल्या विकासकामांचा देखील पाढा वाचला. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करत आहे. एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25 ते 50 वर्षांचा विचार करा, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.  

PM नरेंद्र मोदींची प्रशासनावर पकड

संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, अशी टीका करणाऱ्या विरोधकांवरही अजित पवारांनी निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशासनावर पकड आहे. मात्र काहीजण उगाच उठतात आणि चकाट्या पिटातात की संविधान बदलणार. काहीजण म्हणतायेत की ही शेवटची निवडणूक आहे. हुकूमशाही येणार असे त्यांना म्हणायचे आहे. हे काहीही सांगतात, काहीही आरोप करतात, असं अजित पवारांनी म्हटलं. 

नवनीत राणा अडसूळांच्या भेटीला, चर्चा काय झाली?

कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागतं

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, मला आदेश द्यायची सवय झाली आहे, त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो. पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो.  कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागतं, असं अजित पवार म्हणाले अन् उपस्थितांमध्ये एकच हश पिकला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: