भाजपने 45 जागा जिंकल्या तर राजकारण सोडा', शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं की, भाजप 45 प्लस झालं तर  राजकारण सोडाल.

जाहिरात
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 45 प्लसचं टार्गेट ठेवलं आहे. भाजपच्या मिशन 45 वर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने राज्यात 45 प्लस जागा जिंकल्या तर राजकारण सोडा, असं आव्हान देखील आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. 

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं की, तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल तर माझं तुम्हाला आव्हान आहे. भाजपने 45 प्लस जागा जिंकल्या तर राजकारण सोडा. माझं विधान रेकॉर्ड करा, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. 

विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच

मशाल आहे की आईस्क्रीम कोन

तुमची मशाल आहे की आईस्क्रीम कोन आहे, हे आधी ठरवा. लोकांना या गरमीमध्ये आईस्क्रीमचा कोन हवा आहे, मशाल नको. मशालीची आग आता लोकांना नको आहे. लोक मशाल फेटाळतील, नाकारतील लाथ मारतील. त्यामुळे मशालीला आईस्क्रीमचा कोन म्हणून घ्या, त्यामुळे तरी लोक त्याला काही प्रमाणात स्वीकारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. 

Advertisement

बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या विचाराला तिलांजली दिल्याचं स्वतःच्या कर्तुत्वाने स्पष्ट केलं आहे. म्हणून आता मुंबईकर, मराठी माणूस, हिंदू आणि राष्ट्रभक्त यांना उद्धवजींकडून काही अपेक्षा नाही, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. 

'शिंदे -पवारांबरोबर विश्वासघात अन् राज ठाकरेंचा गेम' जाधवांचा कोणावर नेम?

उद्धव ठाकरे यांच्या विश्वचषक सामन्याविषयीच्या विधानाचाही आशिष शेलार यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचं विश्वचषक सामन्याबाबतचं वक्तव्य बेताल आहे. तुमच्या सुपुत्राने युती असतानाही 2019 साली 151 जागांची घोषणा केली होती. पुत्राला मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग केला. पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

Advertisement
Topics mentioned in this article