लोकसभा निवडणुकीचे कल आता हळू हळू समोर येऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी मतांच्या मोठ्या आघाडीमुळे उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. सध्याच्या कलांनुसार देशात आणि राज्यात एनडीएला फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.
अनेक हक्कांच्या जागावार महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला आहे. मात्र महायुतीला राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन सभा घेतल्या. या तीनही सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं कलांमध्ये दिसून येत आहे.
(नक्की वाचा- महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे?)
(नक्की वाचा - Mumbai LIVE Election Results 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर)
राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या होत्या. आता हाती आलेल्या कलानुसार, रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे, ठाण्यातून नरेश मस्के, कल्याण-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.