सलाउद्दीन शेख, सोलापूर
देशभरात आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदार होत आहे. देशभरात होत असलेल्या मतदानाच्या तुलनेत 4 वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदान केंद्रावर एकही मतदान झालेलं नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी या दोन गावांमध्ये नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. वीज, पाणी व रस्ता नसल्याने सोलापूर जिल्हातील मोहोळ तालुक्यातील भैरववाडी आणि मनगोळी या दोन गावांतील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून आतापर्यंत दोन्ही गावांत एकही मतदान झालेले नाही.
( नक्की वाचा : निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं )
सोलापूर लोकसभेसाठी आज मंगळवार मतदान होत असल्याने मनगोळी व भैरववाडी या गावात सोमवारी दुपारीच मतदान यंत्रे दाखल झाले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रही सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र येथील मतदान केंद्रांवर मतदारच फिरकले नाही.
दरम्यान, ग्रामस्थांनी टाकलेल्या मतदानावरील बहिष्काराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवण्यात आली आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांची मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
(नक्की वाचा- मतदानासाठी निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच मृत्यू, कोल्हापुरातील घटना)
कोणत्या मतदार संघात किती मतदान?
- लातूर - 44.48 टक्के
- सांगली - 41.30 टक्के
- बारामती - 34.96 टक्के
- हातकणगले - 49.94 टक्के
- कोल्हापूर - 51.51 टक्के
- माढा - 39.11 टक्के
- धाराशिव - 40.92 टक्के
- रायगड - 41.43 टक्के
- रत्नागिरी - 44.73 टक्के
- सातारा - 43.83 टक्के
- सोलापूर - 39.54 टक्के
महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत सरासरी 42.63 टक्के मतदानाची नोंद