लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. जवळपास सर्व जागांचं जागावाटप जाहीर झालं आहे. मात्र ठाण्याच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेत चर्चांवर चर्चा सुरु आहेत. मात्र ठाण्याच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्याची जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा आहे. प्रताप सरनाईक यांनी देखील या जागेसाठी आपली तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे.
प्रताप सरनाईक यांनी पोलीस स्थानकात अर्ज केला असून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुह्यांची माहिती मागवली आहे. त्यामुळे सरनाईक कदाचित ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण उमेदवाराला निवडणूक लढताना निवडणूक आयोगाला आपल्यावरील गुन्हांची माहिती द्यावी लागते.
अपघात की घातपात? माजी मंत्र्यांच्या वाहनाला भीषण अपघात, चालकामुळे थोडक्यात बचावले
एकीकडे ठाण्यावर भाजप दावा करत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरात शिवसेनेचाच उमेदवार असेल, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली. अद्यापही उमेदवाराचे नाव जरी जाहीर झाले नसले तरी भाजपकडून संजीव नाईक, आमदार संजय केळकर तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत आहे.
'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'
त्यातच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात येणाऱ्या निवडणुकीत मी उमेदवार असू शकतो, त्यामुळे मला माझ्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती हवी आहे, असा मजकूर लिहिलेला आहे. या पत्रामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात ठाण्याची उमेदवारी शिवसेनेलाच मिळणार आणि प्रताप सरनाईक उमेदवार असणार अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.