राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 23 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. ज्यामध्ये धक्कादायक निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला जात असतानाच आता मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती आहे? याबाबतचा मोठा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे.
आज एक्सिस माय इंडिया संस्थेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केलेत. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा दावा केला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळू शकतात. इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात.
माय इंडिया एक्सिसने राज्यात नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे? याबाबतचाही सर्वे केला आहे. ज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला 31 टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना 18 टक्के नागरिकांची पसंती आहे. धक्कादायक म्हणजे या सर्वेक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून 12 टक्के लोकांनी कौल दिला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना 2 टक्के, शरद पवार यांना 5 टक्के. जयंत पाटील यांना 1 टक्के आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. या सर्वेनुसार एकनाथ शिंदे यांनी भाजपलाही धोबीपछाड दिल्याचे दिसत आहे.
Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे
मुख्यमंत्री म्हणून पसंती कुणाला?
महायुती:
1. एकनाथ शिंदे 31
2. देवेंद्र फडणवीस 12
3. नितीन गडकरी 2
4. अजित पवार 2
5. भाजपचे इतर कुणी 5
महाविकास आघाडी:
1.उद्धव ठाकरे 18
2. शरद पवार 5
3. नाना पटोले 2
4. पृथ्वीराज चव्हाण 1
5. जयंत पाटील 1
6. काँग्रेसकडून इतर कुणी 10
( नक्की वाचा: कोकणात आवाज कोणाचा? चक्रावून टाकणारे अंदाज)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world