माढ्यातून निंबाळकर आणि मोहिते पाटील आमने-सामने, मात्र शरद पवार-देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला

बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा झालेल्या या जागेचा शेवटी जिंकून येणाऱ्या जागांमध्ये समावेश झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथे अटीतटीची लढत दिसत आहे. 

Advertisement
Read Time: 4 mins

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरली. महायुतीकडून येथे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून धैयशील मोहिते पाटील निवडणूक लढवत आहे. माढ्यात एकीकडे महायुतीकडून उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे उमेदवारच मिळत नव्हता अशी परिस्थिती होती.

मात्र काही दिवसात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुरुवातीला महाविकास आघाडीची ही जागा गेल्यात जमा होती. मात्र नंतर या जागेचा जिंकून येणाऱ्या जागांमध्ये समावेश झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात येथे अटीतटीची लढत दिसत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपच्या अंतर्गत कलहाचा शरद पवारांना फायदा

माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिती पाटील यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर होती. मात्र भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी रणजितसिंह यांच्या नावाला पसंती दिली. मात्र आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोहिती पाटील कुटुंबियांना या निवडणुकीत उतरणे गरजेचे होते.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने महादेव जाणकरांना या जागेवर उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनी महायुतीसोबत जाणे पसंत केल्याने शरद पवार गटाकडेही उमेदवार नव्हता. अशा स्थितीत मोहिते पाटलांची अस्तित्वाची लढाई तर शरद पवारांचा उमेदवारांचा शोध इथे येऊन थांबला आणि अखेर धेर्यशील मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

धैर्यशील मोहिते-पाटलांची जमेची बाजू

सध्याची स्थिती पाहता माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली. मतदारसंघातील इतर नेत्यांचाही त्यांना पाठिंबा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होऊ शकतो.  

माढा मतदारसंघात शरद पवारांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. मोहिते पाटील घराणं जमेची बाजू आहेच, याशिवाय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवारासमोर एक नवं आव्हान आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?)

रणजितसिंग नाईक निंबाळकरांची ताकद

एकीकडे विरोधकांनी लावलेली ताकद असली तरी माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विविध विकासकामे आहेत. टॉप 10 खासदारांत मिळवलेले स्थान, मतदारसंघातील पाच आमदारांचा असलेला पाठिंबा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम आधार यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील मोहिते पाटलांचा सामना करायला सक्षम दिसत आहेत. 

माढा मतदारसंघातील राजकीय बेरीज-वजाबाकी

माढा मतदारसंघात धनगर समाजाचा प्राबल्य आहे. उत्तम जानकर धनगर समाजाचे आहेत, पण त्यांना धनगर समाजाकडूनच विरोध सुरू झालेला आहे. ज्यांच्या बरोबर ३० वर्ष संघर्ष केला त्याच मोहिते पाटलांशी हात मिळवणी केल्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. धनगर समाजातल्या नेत्यांनी डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. असं असलं तरी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, मालोजीराजांचे वंशज पिट्टूबाबा निंबाळकर त्यांच्या भगिनी यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उघड पाठिंबा दिला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

प्रचारातील गाजलेले मुद्दे

माढ्यातील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठेची बनवली. महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माळशिरस येथे निंबाळकरांसाठी सभा घेतली. फडणवीस यांनी देखील येथे तीन ते चार सभा घेतल्या. शरद पवारांना जे जमलं नाही ते निंबाळकरांनी येथे पाच वर्षात करुन दाखवलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांना केली. तर मोहिते पाटलांच्या बंडखोरीवरी त्यांना संताप व्यक्त केला. मी कुणाच्या वाट्याल जात नाही, मात्र माझा विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो. मी काहीही करत नाही पण तसं होतं, असं वक्तव्य फडणवीसांना जाहीर सभेतून केलं होतं. मोहिते पाटील कुटुंबाने सहकार क्षेत्र संपवण्याचा देखील त्यांच्यावर होतो. 

दुसरीकडे शरद पवारांनी देखील बारामतीनंतर माढा मतदारसंघात सर्वाधिक लक्ष दिलं. माढ्यातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघ शरद पवारांनी पिंजून काढले. शेतकऱ्यांचे मुद्दे आणि फोडाफोडीचं राजकारण येथील प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. 

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

माढ्यातील मतदान

माढा येथे या निवडणुकीत 63.65 टक्के मतदान झालं. 

  • करमाळा - 55.84 टक्के
  • माढा - 66.48 टक्के
  • माळशिरस - 66.43 टक्के
  • माण - 61.66 टक्के
  • फलटण - 67.05 टक्के
  • सांगोला - 64.10 टक्के 

माढा मतदासंघातील आमदारांची ताकद

माढा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात, ते सर्वजण युतीच्या बाजूने आहेत. त्यापैकी 4 सोलापुरात तर दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यात येतात. यामध्ये माढामध्ये अजित पवार गटाचे बबन शिंदे, माणमध्ये भाजपचे जयकुमार गोरे, करमाळामध्ये अपक्ष संजय शिंदे, फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण, माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि सांगोला येथे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत.