बच्चू कडूंना कोणी केला संपर्क? पाठिंबा कोणाला ते ही केलं स्पष्ट

काही आमदार कमी पडले तर अपक्ष आणि छोट्या पक्षांची मदत घेण्याची तयारी आघाडी आणि युतीने चालवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहीले आहेत. निकाल कोणाच्या बाजून लागेल हे अजूनही ठाम पणे सांगता येत नाही. अशा वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीने सरकार आपलेच येणार असल्याचा दावा केला आहे. त्यातही काही आमदार कमी पडले तर अपक्ष आणि छोट्या पक्षांची मदत घेण्याची तयारी आघाडी आणि युतीने चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनाही आघाडी बरोबरच युतीच्या नेत्यांनी संपर्क केला आहे. अशी माहिती स्वत: कडू यांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं तिसरी आघाडी स्थापन करत विधानसभा निवडणूक लढली आहे. या निवडणुकीत प्रहारला 10 ते 15 जागा मिळतील असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शिवाय आपल्याला पाठिंबा द्यावा असेही त्यांनी सांगितले. राजकीय घडामोडींना वेग आला असल्याने कडू हे मुंबईत दाखल झाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी संपर्क केला आहे. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंतीही केली आहे. असं असलं तरी आपण अजूनही कोणाला पाठिंब्याचा शब्द दिलेला नाही. उद्या मतमोजणी होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेवू असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांची भूमिका कडू यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र सत्ता स्थापनेत आपली भूमिका ही महत्वाची असेल हेच कडू यांनी सांगून टाकले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या निकालानंतर 48 तास का महत्त्वाचे? कशी असेल सत्ता स्थापनेची प्रक्रिया?

विधानसभेच्या 288 मतदार संघासाठी 20 तारखेला मतदान झाले. उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या आधी आलेल्या एक्झिट पोलमुळे नक्की काय निकाल लागणार याचा अंदाज कोणालाही येत नाही. अनेक पोलमधून महायुतीला कौल दिल्याचा दिसत आहे. तर काही पोल हे महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देताना दिसत आहे. एक पोल तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे नक्की सांगता येत नाही. इथे अटीतटीची लढत आहे असे सांगत आहे. त्यामुळे आघाडी आणि महायुतीत सध्या तणावाचां वातावरण आहे.   

Advertisement