राज्यात सत्ता मिळाली तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुर्नविकास करणारा प्रकल्प रद्द करु असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलं आहे. ठाकरेंच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी समाचार घेतला आहे. योजना स्थगित करणे किंवा बंद करणे याशिवाय दुसरं काहीही उद्धव ठाकरेंना येत नाही, असं शिंदे यांनी सुनावलं आहे.
स्वत: बंगल्यात राहातात...
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, धारावीमध्ये 1-2 लाखं लोकं खराब स्थितीमध्ये राहतात. लोकं घाणीत राहत आहेत. त्यांच्या जवळपास प्रचंड घाण आहे. हे नेते मात्र स्वत: मोठ्या घरात आणि बंगल्यात राहतात. ते गरिबांना घाणीतचं ठेवतात, अशी टीका शिंदे यांनी केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमच्या सरकारनं धारावीमध्ये सर्वांना घर देण्याची घोषणा केली आहे. एका घराची किंमत किमान एक कोटी रुपये असेल. एकूण 2 लाख कोटींची घरं तिथं तयार होणार आहेत, असं शिंदे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी बिल्डरांना सूट दिली होती. त्यावर आता कॅपिंग करण्यात आलं आहे. टीडीआरमध्येही कॅपिंग करण्यात आलंय. सर्वांना घर देण्याची जबाबदारी आहे. यापूर्वी डेव्हलपर्सशी त्यांचं जमत असे. आता का जमत नाही? मॅच फिक्सिंगचा खेळ आता समाप्त झाला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : महाराष्ट्र जिंकण्यासाठी PM मोदींचा MMM मंत्र, वाचा काय आहे अर्थ? )
महाविकास आघाडीला आव्हान
महाविकास आघाडी सरकारनं काय कामं केली हे सांगावं, असं आव्हान शिंदे यांनी दिलं. तुम्ही किती कामं स्थगित केले आणि आम्ही किती सुरु केले, हे देखील सांगितलं पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या लोकंनी त्याला विरोध केला. आता ते आमचं अनुकरण करत आहेत. आमच्या योजनांची नक्कल करत आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकऱ्यांचे कर्ज माफ हे सर्व निर्णय आम्ही घेतले आहे. महाविकास आघाडी आमची कॉपी करत आहे, असं त्यांनी सांगितलं.