आधी 5 कोटी आता 13 लाखाची रोकड जप्त, पुण्यात झाली कारवाई

स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन चालक वसीऊल्ला वलीउल्ला खान याला ताब्यात घेतले आहे. शिवाय ही रक्कम कोणाची आहे याबाबत त्याला विचारणा करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

हडपसर विधानसभा मतदारसंघात हडपसर येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पुणे सोलापूर रस्त्यावर मांजरी बुद्रुक इथे काही वाहनं तपासण्यात आली. त्यात क्रेटा गाडीही होती. या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यातून तब्बल 13 लाखांची रोकड आढळून आली. त्यानंतर सर्वेक्षण पथकाने ही रोकड जप्त केली आहे. द्राक्ष संशोधन केंद्रा समोर ही कारवाई करण्यात आली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन चालक  वसीऊल्ला वलीउल्ला खान याला ताब्यात घेतले आहे. शिवाय ही रक्कम कोणाची आहे याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने ही रक्कम आपल्या मालकाची आहे. आपला मालक भंगार व्यवसायीत आहे असंही त्यांना सांगितले. मात्र त्याबाबत कोणतीही कागदपत्रे त्याला सादर करता आलेली नाहीत. त्यामुळे ही सर्व रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

याबाबत आता पंचनामा करण्यात आला आहे. शिवाय गुन्ह्याची नोंद करत ही संपुर्ण रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस करत आहेत. निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होऊ शकतो. हे लक्षात घेता सर्वेक्षण पथक सज्ज झाली आहेत. त्यांची अशा हालचालींवर करडी नजर आहे. निवडणुकीत कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीची पहिली यादी आली, कोणाला उमेदवारी कोणाला वगळलं?

दरम्यान काही दिवसापूर्वी पुण्या जवळच खेड शिवापूर टोल नाक्यावर जवळपास 5 कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली होती. ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता. संजय राऊत यांनी तर एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. प्रत्येक उमेदवाराला ते 75 कोटी देणार आहेत. त्यातील 15 कोटींचा हा पहिला हफ्ता होता असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान हे आरोप शहाजीबापू पाटील यांनी फेटाळले होते.   

Advertisement