Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतल्या भांडुपमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी सुरुवातीलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाण करणारा भिकार संपादक इथं राहतो, या शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर हल्ला चढवला.
काय म्हणाले राज ठाकरे?
काही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणणार. कुणी दादागिरीची भाषा केली तर दुप्पट दादागिरीनं उतरेन, मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाही, समोरच्यांनी एकदा आजमावून पाहावं असं राज यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जाहीर केलं.
'संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करणारा भिकार संपादक इथं राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच आहे. आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. शोलेमध्ये डायलॉग होता, तू दोन मारोगे तो हम चार मारेंगे. घाण करुन टाकलं सर्व राजकारण...
( नक्की वाचा : चर्चा तर होणारच ! राज ठाकरेंनी वरळीत भाषण केलं, पण आदित्यचं नावंही नाही घेतलं )
कोण बोललं आणि काय बोललं हा माझा प्रश्न नाही. कोण काय बोलतंय कुणावर बोलतंय किती खालच्या थरावर बोलतंय त्याचं मला देणंघेणं नाही. पण, हे दाखवतात तेव्हा भविष्यातील पिढीला वाटतं हेच राजकारण, हाच समज होत गेला तर महाराष्ट्राचं राजकारण किती घाण होईल याचा विचार केला आहे का? त्यांना वाटतं आमच्याकडं तोंडं नाहीत. आमचं जर तोंड सुटलं ना तर त्यांना कल्पना आहे या गोष्टींची.. संयम बाळगतो याचा अर्थ XX डू समजू नये, असा इशारा राज यांनी दिला.