महाविकास आघाडीचं घोडं कुठं अडलंय? काँग्रेस- शिवसेना UBT मध्ये कोणत्या जागांवर मतभेद ?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यात सत्तेत पुनरागमन करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचं (MVA) घोडं जागा वाटपावर अडलं आहे.  विरोधी पक्षांच्या आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं उघड झालंय. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांमध्ये काही जागांवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांकडे धाव घेतली आहे. त्यानंतरही महाविकार आघाडीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना-काँग्रेससह समाजवादी पार्टीचाही काही जाागांवर दावा आहे. समाजवादी पक्ष या जागांची काँग्रेसकडं मागणी करत आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या जागांवर वाद?

अरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती आणि वरोरा या जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे. यामधील अरमोरी, गडचिरोली, चिमूर, बल्लारपूर, कामठी आणि दक्षिण नागपूर या जागा मागील निवडणुकीत भाजपानं जिंकल्या होत्या. 

Advertisement

गोंदिया, चंद्रपूर, रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. तर फक्त भद्रावती ही एकमेव जागा काँग्रेसकडं आहे. चंद्रपूरच्या सध्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर भद्रावतीमधून निवडून आल्या होत्या. आता जागावाटपाच्या दरम्यान या जागांवर काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही जागांचीही शिवसेनेनं काँग्रेसकडं मागणी केली आहे. त्या जागांवर काँग्रेसला कधीही विजय मिळवता आलेला नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : 'पार्टी विथ नातीगोती' भाजपाच्या पहिल्या यादीत सगेसोयऱ्यांना प्राधान्य )

शरद पवारांकडं धाव

काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी हा वाद सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्याकडं धाव घेतली. उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. तर काँग्रेसकडून पवारांशी चर्चा करण्याची जबाबदारी नसीम खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पवारांनी हा वाद लवकरच संपुष्टात येईल अशी आशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेस नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

Advertisement

राज्यातील सर्व 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.