विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) संपुष्टात येईल. यंदा राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही मुख्य लढत आहे. पण, यामधील कोणत्याही पक्षानं किंवा आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. दोन्ही आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. महायुतीमधील दावेदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय. ते 'NDTV मराठी' च्या 'या सर'कार' कार्यक्रमात बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शेलार?
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर वाईट कुठं आहे? प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं तसंच शिंदेंना देखील परत एकदा व्हावं असं वाटत असावं असं शेलार उत्तर शेलार यांनी दिलं. महाविकास आघाडी धार्मिक ध्रुवीकरण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते अल्पसंख्याक समाजाची मत मागणार आणि मग आम्ही गप्प राहू का? असा सवाल त्यांनी विचारला. मतदार व्होट जिहादला विधानसभा निवडणुकीत उत्तर देतील असा दावाही त्यांनी केला.उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी हिंदू यांना सोडत असल्यानेच आता वेगवेगळे फतवे निघत आहेत अशी टीका शेलार यांनी या मुलाखतीमध्ये केली.
महाविकास आघाडीकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नाही महायुती मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेने विकासाचा अजेंडा मांडत आहे यापूर्वी आम्ही केलेले विकास कामे लोकांना सांगतोय आणि भविष्यात सुद्धा कोणते विकास कामे करणारे सांगत आहे असे सांगितले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : सज्जाद नोमानी म्हणतात, महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकारही टार्गेट! शेलारांनी शेअर केला Video )
माहीम आणि वरळी महायुती जिंकणार
मुंबईतील माहीम आणि वरळी या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. माहीममधून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवतायत. तर वरळीमध्ये सलग दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे रिंगणात आहेत. या दोन्ही जागा महायुती जिंकणार असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. मनसे आणि आम्ही एकत्र नसलो तरी ते माझे मित्र आहेत, असं शेलार यांनी राज ठाकरेंवरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.