महाराष्ट्र नव निर्माण सेना विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी जवळपास 225 ते 250 जागा लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचाही दौरा केला होता. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. काहींच्या उमेदवाऱ्याही त्याच वेळी जाहीर केल्या होत्या. त्यामुळे मनसे सर्वात जास्त उमेदवार विधानसभेला उभे करेल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. मनसेला विधानसभेच्या सर्व जागांसाठी उमेदवार मिळू शकले नाहीत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते विधानसभेलाही महायुती बरोबर जातील अशी शक्यता होती. मात्र सर्वांचे अंदाज चुकवत राज ठाकरे यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महायुतीतमध्येच जागा वाटपावरून मारामारी होती. त्यात आपल्या पदरात काय पडणार? किती कार्यकर्त्यांना न्याय देता येणार? याचा विचार करत राज यांनी थेट स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. शिवाय 250 जागा लढणार असल्याचेही सांगितले. सर्वात आधी मनसेनेच आपले उमेदवार जाहीर केले. त्यात बाळा नांदगावकर यांचा समावेश होता. त्यानंतर राज राज्याच्या दौऱ्यावर गेले तिथेही त्यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.
ट्रेंडिंग बातमी - 'आबांचे केस खूप लहान होते, त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाहीत' संजय राऊत
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी 29 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. सर्व पक्षांच्या उमेदवारींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अनेक ठिकाणी बंडखोरही मैदानात आहेत. त्यात आता मनसेच्या किती उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे, याचा आकडा समोर आला आहे. मनसेच राज्यात 135 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 288 मतदार संघात राज यांच्या मनसेला उमेदवार मिळालेले नाहीत हे यावरून स्पष्ट होत आहे. भाजपनंतर सर्वात जास्त उमेदवार हे मनसेचेच मैदानात आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मुनगंटीवारांचा खंदा कार्यकर्ता ढसाढसा रडला, कारण काय?
135 उमेदवारां पैकी किती उमेदवारी विजयी होतील याची चर्चा आता सुरू झाली आहे. मनसेने आपल्या प्रमुख नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यात बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, राजू पाटील, अविनाश जाधव,यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राज यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही माहिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मागिल दोन निवडणुकीत मनसेला यश मिळाले नव्हते. मनसेचे फक्त एक एक आमदार निवडून आले होते.
ट्रेंडिंग बातमी - Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेत दोन आघाड्या, सहा पक्ष अन् बंडखोरीला उधाण
मनसेला 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर मनसेला अशी कामगिरी करता आली नाही. या निवडणुकीत सर्वच राजकी पक्षांची खिचडी झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडली आहे. राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत. अशा स्थिती मनसे आपला पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्याच्या राजकारणाला कंटाळून जनता आपल्या मागे उभी राहील असा विश्वास राज ठाकरे यांना आहे. मनसे हा विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेतला पक्ष असेल असे वक्तव्यही राज यांनी केले होते. त्यामुळे 135 पैकी जास्तीत जास्त उमेदवार मनसेला निवडून आणावे लागतील.