सिंचन घोटाळ्या प्रकरणी खूली चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. ही बाबत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दाखवली होती. आर. आर. पाटील यांना आपण जपलं होतं. त्यांची काळजी घेतली होती. असं असतानाही आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. आबांचे केस हे खूप लहान होते. त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाही असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंचन घोटाळ्याची खुल चौकशी करण्याची परवानगी आर. आर. पाटील यांनी दिली होती. यावरून सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. मात्र आर. आर. पाटील हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार गृहमंत्री होते असे संजय राऊत यांनी सांगितले. गृहमंत्री म्हणून त्यांनी काही चुकीचं काम केलं असं आम्हाला वाटत नाही असेही राऊत म्हणाले. चौकशीचे आदेश देण्याची सही जर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दाखवली असेल तर तो गोपनियतेचा भंग आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुनगंटीवारांचा खंदा कार्यकर्ता ढसाढसा रडला, कारण काय?
मंत्री किंवा मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या वक्तीला पदावर बसताना गोपनियतेची शपथ दिली जाते. या शपथेचाच फडणवीस आणि पवारांनी भंग केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्याची दखल घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राऊत यांनी केली. या सर्व गोष्टी गोपनिय असताना त्या सर्वां समोर कशा आल्या असा प्रश्नही यावेळी राऊत यांनी केला. विधानसभेच्या प्रचारा वेळी अजित पवारांनी ही बाब जाहीर पणे सांगितली होती.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?
मशाली विरोधात जास्तीत जास्त ठिकाणी धनुष्यबाणाचे चिन्ह दिले गेले आहे. ही मोदी आणि अमित शहा यांची रणनिती आहे असा आरोप त्यांनी केला. धनुष्यबाण अजूनही ग्रामिण भागात जनतेच्या मनात आहे. त्यातून आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही ते म्हणाले. दरम्यान विदर्भात काँग्रेस सर्वात जास्त जागा लढत आहे. काही ठिकाणी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांची आम्ही समजूत काढू असेही राऊत म्हणाले. सध्याच्या स्थिती सर्वांना उमेदवारी हवी आहे. पण त्यांना ती देता येणे शक्य नाही. आघाडीत निवडणूक लढताना जागा लढण्यावर मर्यादा येतात असेही ते म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात काही राजकीय पक्ष आहेत. ज्यांचे मुख्य अन्न हे सुपारी आहे. ते सुपारीवरच जगतात. अशा पक्षांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पाडण्याची सुपारी घेतली आहे. अशा पक्षांनाही या निवडणुकीत जनता जागा दाखवेल असंही ते म्हणाले. दरम्यान शेकापबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. रायगडमधील काही जागा त्यांना देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असंही यावेळी राऊत म्हणाले. आघाडीत कोणीही बंडखोरी केलेली नाही. पर्यायी उमेदवार उभे राहीले आहेत. ते आपली उमेदवारी मागे घेतली असेही राऊत म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world