शरद पवार विरुद्ध अजित पवार, बारामतीच नाही तर 11 ठिकाणी काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला

जाहिरात
Read Time: 2 mins
Sharad Pawar Ajit Pawar
मुंबई:

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात आपल्या पक्षांसह उभे आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीची पहिली फेरी शरद पवार यांनी जिंकली होती. त्या निवडणुकीत शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले. तर अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली. 

लोकसभा निवडणूक ही सेमी फायनल होती. काका-पुतण्यांची खरी लढाई ही विधानसभा निवडणुकीत होणार आहे. दोन्ही नेते त्याची गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत आहेत. अजित पवारांच्या गटाकडं राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. तर शरद पवारांना नवे चिन्ह आणि नव्या पक्षाच्या नावासह निवडणूक लढवावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीनंतर 11 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये थेट लढत होणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि युगेंद्र पवार हे काका-पुतणे आमने-सामने आहेत. पवार कुटुंबीयातील या हायप्रोफाईल लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. बारामतीच नाही तर एकूण 11 मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आमने-सामने आहेत. पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

( नक्की वाचा : निवडणुकीच्या फडात नात्यात कुस्ती! नवी मुंबई ते गडचिरोली, व्हाया बारामती! )

कोणत्या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार? 

बारामती
युगेंद्र पवार
शरद पवार गट

अजित पवार
अजित पवार गट

---

मुंब्रा

जितेंद्र आव्हाड
शरद पवार गट

नजीब मुल्ला
अजित पवार गट
---
आंबेगाव

देवदत्त निकम
शरद पवार गट

दिलीप वळसे पाटील
अजित पवार गट
---
हडपसर

प्रशांत जगताप
शरद पवार गट

चेतन तुपे
अजित पवार गट
---
इंदापूर

हर्षवर्धन पाटील
शरद पवार गट

दत्ता भरणे
अजित पवार गट
----
उदगीर

सुधाकर भालेराव    
शरद पवार गट

संजय बनसोडे
अजित पवार गट
--
तुमसर
चरण वाघमारे
शरद पवार गट

राजू कारेमोरे
अजित पवार गट
---
कोपरगाव

संदीप वर्पे
शरद पवार गट

आशुतोष काळे
अजित पवार गट
---
कागल

समरजीत घाटगे
शरद पवार गट

हसन मुश्रीफ
अजित पवार गट
 

Topics mentioned in this article