Explained : PM मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' घोषणेवर भर का दिला?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला. या निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीमध्ये भाजपा सर्वात जास्त जागा लढवत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपानं राज्यभर संपूर्ण शक्तीनीशी प्रचार केला. राज्यातील सर्व नेत्यांसह देशभरातील नेते आणि केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या प्रत्येक भाषणात 'एक है तो सेफ है' ही घोषणा दिली.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेसह पंतप्रधानांच्या 'एक है तो सेफ है' या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचारात चर्चा होती. पंतप्रधानांनी ही घोषणा का दिली हे समजून घेऊया

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काँग्रेसच्या प्रचाराला उत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये विरोधी पक्षांनी 'संविधान खतरे में' ही घोषणा दिली होतीय. विरोधकांनी सेट केलेल्या या नरेटीव्हचा फटका भाजपाला बसला असल्याची कबुली पक्षाच्या नेत्यानं निवडणूक निकालानंतर दिली. त्याचबरोबर जातीय जनगणणेची मागणी देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्यानं लावून धरली आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 

विरोधकांचा हा प्रचार मुस्लीम तृष्टीकरणाशी जोडून मोदींनी 'एक है तो सेफ है' ही घोषणा दिली आहे. काँग्रेस मुस्लीमांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला धक्का लावणार असल्याचा पंतप्रधानांचा दावा आहे. विरोधकांचं हे राजकारण रोखण्यासाठीच सर्व जातीसमुहानं एक राहावं, यासाठी पंतप्रधानांनी ही घोषणा दिलीय.

( नक्की वाचा : सज्जाद नोमानी म्हणतात, महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकारही टार्गेट! शेलारांनी शेअर केला Video )
 

लोकसभेतील चुकांपासून धडा

लोकसभा निवडणुकीत दिलेली 400 पार ही घोषणा भाजपावर बुमरँग ठरली. भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं तर त्याचा वापर करुन राज्यघटनेत बदल होईल, हा विरोधकांचा प्रचार ज्या राज्यातील मतदारांना सर्वाधिक भावला त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

Advertisement

भाजपाच्या लोकसभेतील संख्याबळ 303 वरुन 240 वर घटलं. त्याला मागास आणि अतिमागास जातींमध्ये निर्माण झालेल्या आरक्षण समाप्त होणार ही भीती तसंच एकमेकांबद्दलची असुरक्षितता हे कारण होतं. हा प्रचार खोडून काढण्यासाठी आणि सर्व जातींना हिंदुत्त्वाच्या झेंड्याखाली एक आणण्यासाठीच पंतप्रधानांनी 'एक है तो सेफ है' ही घोषणा विधानसभा निवडणूक प्रचारात वारंवार दिली. 
 

Topics mentioned in this article