महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामुळे संपूर्ण देशात आश्चर्याचं वातावरण आहे. राज्यात भाजपा आणि महायुतीला इतका मोठा विजय मिळेल, याची कल्पना कुणीही केलेली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना या विजयाचं रहस्य सांगितलं आहे.
हरियाणानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश आहे, एकता. 'एक है तो सेफ है' हा देशाचा महामंत्र बनला आहे. 'एक है तो सेफ है' हे महाराष्ट्रानं 'डंके के चोट' वर सर्वांना सांगितलंय. या मंत्रानं जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर द्वेष पसरवणाऱ्या धडा शिकवलाय. त्यांना शिक्षा दिली आहे. समाजातील सर्व वर्गानी NDA ला मत दिलं. हा काँग्रेस आणि इको सिस्टीमच्या सर्व विचारधारेला चोख उत्तर आहे. हा विचार समाजाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाला सलग तीन वेळा जनादेश देणारं महाराष्ट्र हे देशातील सहावं राज्य आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, आणि मध्य प्रदेशात आम्ही सलग तीन वेळा विजय मिळवला. बिहारमध्येही NDA ला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. त्याचबरोबर 60 वर्षांनी तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. हा जनतेचा आमच्या सुशासनावरचा विश्वास आहे. तो कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु, असं मोदींनी सांगितलं.
महाराष्ट्रात विकास, सुशासन आणि खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खोटारडेपणा, लबाडी आणि घराणेशाहीचा पराभव झाला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार )
भाजपाला सलग तीन वेळा जनादेश देणारं महाराष्ट्र हे देशातील सहावं राज्य आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, आणि मध्य प्रदेशात आम्ही सलग तीन वेळा विजय मिळवला. बिहारमध्येही NDA ला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. त्याचबरोबर 60 वर्षांनी तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. हा जनतेचा आमच्या सुशासनावरचा विश्वास आहे. तो कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु, असं मोदी यांनी स्पष्ट केलं.
आम्ही विकास आणि वारसा या दोन्हीलाही सोबत नेतो. महाराष्ट्रात इतके महापुरुष जन्मले आहेत. भाजपा आणि माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्यदैवत आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. आम्ही नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचं नमन केलंय. तेच आमच्या आचरणात आहे. आमच्या व्यवहारात आहेत.
( नक्की वाचा : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार? )
मातृभाषेचा सन्मान म्हणजे आईचा सन्मान आहेत, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी मराठीला अभिजात भाषा देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला, याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली.
देशातील मतदारांना अस्थिरता नको आहे. मतदारांना 'नेशन फर्स्ट' च्या भावनेसोबत आहेत. जे 'खुर्ची फर्स्ट' चं स्वप्न पाहातात ते मतदारांना आवडत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
( नक्की वाचा : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )
संपूर्ण देशात फक्त एकच संविधान असेल. ते बाबासाहेब आंबेडरांचं संविधान असेल. भारताचं संविधान असेल. जे उघडपणे किंवा छुप्या पद्धतीनं दोन संविधानाच्या गोष्टी करेल त्यांना देश नाकारेल, हे महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्याचा प्रयत्न केला. हे चालणार नाही. जगातील कोणतीही शक्ती कलम 370 पुन्हा लागू करु शकत नाही, हा देखील महाराष्ट्राच्या निकालाचा अर्थ असेल, असं PM मोदी यावेळी म्हणाले.