जाहिरात

Ambernath News : भाजपचा काँग्रेसला अंबरनाथमध्ये दे धक्का, निलंबित 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ शहर चर्चेत आलं ते भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे.

Ambernath News : भाजपचा काँग्रेसला अंबरनाथमध्ये दे धक्का, निलंबित 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress corporators from Ambernath join BJP : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ शहर चर्चेत आलं ते भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे. शिवसेना शिंदे गटानंतर आता भाजपने काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. नवी मुंबई या ठिकाणी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पक्षप्रवेशाची केवळ अंबरनाथमध्येच नाही तर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. 

अंबरनाथ नगरपालिकेतली इनसाईड स्टोरी 

मुळात अशक्यातली अशक्य गोष्ट अंबरनाथमध्ये घडली होती. ती म्हणजे भाजप आणि काँग्रेसची युती. भाजपशी युती केली म्हणून काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना काँग्रेसनं निलंबित केलं होतं. ते काँग्रेसचे १२ च्या १२ नगरसेवकांनी २४ तासांच्या आत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेचे 27 म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. यामध्ये भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 1 असं बलाबल आहे.

BMC Candidate List 2026 : मुंबई महानगरपालिकेत जंगी लढत; 227 प्रभाग, 1700 उमेदवार, संपूर्ण यादी एका क्लिकवर

नक्की वाचा - BMC Candidate List 2026 : मुंबई महानगरपालिकेत जंगी लढत; 227 प्रभाग, 1700 उमेदवार, संपूर्ण यादी एका क्लिकवर

शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं अंबरनाथमध्ये चक्क ऑपरेशन लोटस केलं. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे ३१ नगरसेवक एकत्र करुन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसनं १२ नगरसेवकांना निलंबित केल्यावर तर भाजपनं थेट त्या १२ नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलं. पण शिंदेंना मात्र दूर ठेवलं. आता अंबरनाथमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय आणि अंबरनाथ काँग्रेसमुक्त झालंय. खरं तर सत्तेसाठी भाजपनं काँग्रेसला सोबत घेतलं, असा मेसेज गेला होता. पण काँग्रेसनं त्या १२ नगरसेवकांना निलंबित करण्याची घाई केली आणि काँग्रेसचे निलंबित झालेले १२ च्या १२ नगरसेवक भाजपकडे गेले. 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची यादी

  1. प्रदीप नाना पाटील
  2. दर्शना उमेश पाटील
  3. अर्चना चरण पाटील
  4. हर्षदा पंकज पाटील
  5. तेजस्विनी मिलिंद पाटील
  6. विपुल प्रदीप पाटील
  7. मनीष म्हात्रे
  8. धनलक्ष्मी जयशंकर
  9. संजवणी राहुल  देवडे
  10. दिनेश गायकवाड
  11. किरण बद्रीनाथ राठोड
  12. कबीर नरेश गायकवाड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com