लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (4 जून 2024) जाहीर होत आहे. दे शातील 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 48 तर मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मतदान झालं. मुंबई आणि ठाणे लोकसभेची निवडणूक आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईकर ठाकरे गट की शिंदे गट? कुणाच्या बाजूने आहेत याचा फैसला देखील या निवडणुकीतून होणार आहे.
मुंबईत महाविकास आघाडीकडून सहापैकी चार जागांवर शिवसेना ठाकरे गट मैदानात आहे. तर दोन जागांवर काँग्रेस निवडणूक लढत आहे. तर महायुतीकडून भाजप आणि शिवसेना शिंदे गट प्रत्येकी तीन जागांवार निवडणुकीत उतरले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वाचं लक्ष आहे. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचं भवितव्य देखील या निवडणुकीत ठरणार आहे.
आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे काम केले - पंतप्रधान मोदी
Mumbai LIVE Election Results 2024 : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर 1 मताने आघाडीवर
मुंबईतील सहापैकी पाच जागांवर मविआचा विजय
1. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ : भाजपचे पीयूष गोयल विजयी, काँग्रेस भूषण पाटील पराभूत
2. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ : काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी, भाजपचे उज्वल निकम पराभूत
3. मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ : संजय दिना पाटील (शिवसेना, उबाठा) विजयी, भाजपचे मिहीर कोटेचा पराभूत
4. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अमोल कीर्तिकर (शिवसेना, उबाठा) पराभूत, रविंद्र वायकर (शिवसेना, शिंदे गट) विजयी
5. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ : अरविंद सावंत (शिवसेना, उबाठा) विजयी, यामिनी जाधव (शिवसेना गट) पराभूत
6. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ : अनिल देसाई (शिवसेना, उबाठा) विजयी, राहुल शेवाळे (शिवसेना गट) पराभूत
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल विजय
पीयूष गोयल 3 लाख 50 हजार 921 मतांनी विजयी
"लोकांनी लोकशाहीच्या बाजूने जे दिले, तेच महाराष्ट्राचे निकाल आहेत" - रोहित पवार, आमदार( राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार)
"लोकांनी लोकशाहीच्या बाजूने जे दिले, तेच महाराष्ट्राचे निकाल आहेत" - रोहित पवार, आमदार( राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार)
वर्षा गायकवाड विजयी, उज्वल निकम यांचा केला पराभव
मुंबईत भाजपला मोठा झटका, मोठ्या आघाडीनंतर उज्वल निकम पिछाडीवर
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मोठा ट्विस्ट
आघाडीवर असलेले उज्ज्वल निकम पिछाडीवर
वर्षा गायकवाड 793 मतांनी आघाडीवर
वर्षा गायकवाड यांना 3,94,745 तर उज्वल निकम यांना 3,93,952 मते
राज्यात भाजपविरोधात निकाल लागल्याने कार्यलयात शुकशुकाट
राज्यात भाजपविरोधात निकाल लागल्याने कार्यलयात शुकशुकाट
ज्येष्ठ नेते जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यालयात येणार होते
मात्र कोणीही नेते कार्यालयात नाही, कार्यकर्ते देखील खूप कमी संख्येने कार्यालयात उपस्थित
रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंचे केले अभिनंदन
आतापर्यंतचे सगळे अंदाज फेल केलेले आहेत. मी एकाच नेत्याला सॅल्युट करायला आलो आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रच केंद्रबिंदू आहे, हेच आज शरद पवारांच्या माध्यमातून स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. - जितेंद्र आव्हाड, नेते (NCPशरदचंद्र पवार)
2 निवडणुकांनंतर काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, कोणत्या राज्यांनी दिला राहुल गांधींना 'हात'?
Lok Sabha Elections 2024 Result : 2014 आणि 2019 मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस 100 जागांच्या जवळ पोहोचलीय.
Nitesh Rane | जल्लोष कसा असतो हे आम्ही महाराष्ट्राला दाखवू - नितेश राणे
ठाणे शहरामध्ये नरेश मस्के यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करत जल्लोष साजरा
ठाणे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर, उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आघाडी-पिछाडीचा खेळ
रविंद्र वायकर आणइ अमोल कीर्तिकरांमध्ये विजयासाठी रस्सीखेच
कीर्तिकरांकडे 4,963 मतांची आघाडी
Mumbai LIVE Election Results 2024 : भिवंडी मतदारसंघातून मविआचे सुरेश म्हात्रे आघाडीवर
ठाणे आणि एकनाथ शिंदे हेच समीकरण आहे, जे कोणीही बदलू शकत नाही - नरेश म्हस्के (उमेदवार, शिवसेना शिंदे गट)
Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंनी करुन दाखवलं?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या होत्या.
दक्षिण मुंबई मतदारसंघ :
नवव्या फेरी अखेरीस
अरविंद सावंत -23 हजार 986 मते
यामिनी जाधव - 16 हजार 929 मते
अरविंद सावंत 7हजार 057 मतांनी आघाडीवर
मुंबईत वंचितला सपशेल अपयश, मतदानाची टक्केवारी देखील मागील निवडणुकीपेक्षा घटली
मुंबईत वंचितला सपशेल अपयश, मतदानाची टक्केवारी देखील मागील निवडणुकीपेक्षा घटली
वंचितचा करिष्मा मुंबईत फेल, अनेक ठिकाणी नोटापेक्षा वंचितला मुंबईत मतदान कमी
मुंबई उत्तरमधून वंचितला 1429 मतं, मुंबई उत्तर मध्यमधून 3600 मतं
मुंबई उत्तर पूर्वमधून 2665, उत्तर पश्चिममधून 5962 मतं
मुंबई दक्षिणमधून केवळ 994 मतं, दक्षिण मध्य मुंबईतून 7 हजार 342 मतं
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आघाडीवर
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आघाडीवर
अमोल कीर्तिकर 4005 मतांनी आघाडीवर
काँग्रेस देशभरात 150 जागांवर विजयी होईल, संजय राऊतांचा दावा
काँग्रेस देशभरात 150 जागांवर विजयी होईल, संजय राऊतांचा दावा
मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस
मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस
उज्ज्वल निकम, रविंद्र वायकर, पियुष गोयल हे महायुतीचे उमेदवार आघाडीवर
तर अनिल देसाई , अरविंद सावंत, संजय दीना पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
भाजपा - 2
ठाकरे गट- 3
शिवेसना - 1
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर
ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर
नरेश म्हस्के 62,246 मतांनी आघाडीवर
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील पिछाडीवर
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील पिछाडीवर
महविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे आघाडीवर
बाळ्यामामा म्हात्रे 7678 मतांनी आघाडीवर
मते
कपिल पाटील - 51257
बाळ्या मामा - 58935
निलेश सांबरे - 38711
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई 12 हजार मतांनी आघाडीवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई 12 हजार मतांनी आघाडीवर
अनिल देसाई: 89033
राहुल शेवाळे: 76785
12248 मतांनी देसाई आघाडी
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आघाडीवर
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आघाडीवर
ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर
नरेश म्हस्के 29867 मतांनी आघाडीवर
मते
नरेश म्हस्के - 104285
राजन विचारे - 74418
दक्षिण मध्य मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत अनिल देसाई आघाडीवर
दक्षिण मध्य मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत अनिल देसाई आघाडीवर
अनिल देसाई: 60912
राहुल शेवाळे: 57763
उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई 3149 मतांनी आघाडीवर
उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रविंद्र वायकर आघाडीवर
उत्तर पश्चिम मुंबई
रविंद्र वायकर - ३८ हजार १९२
अमोल किर्तीकर - ३१ हजार ६९१
रविंद्र वायकर ६५०१ मतांनी आघाडीवर
मुंबईत ठाकरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवर
मुंबईत ठाकरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवर
पालघर मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजप आघाडीवर
पालघर मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजप आघाडीवर
डॉ. हेमंत सावरा 6 हजार 236 मतांनी आघाडीवर
मुंबईत ठाकरे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर
मुंबईत ठाकरे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर आघाडीवर
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल आघाडीवर
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल आघाडीवर
महविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे पिछाडीवर
कपिल पाटील 2653 मतांनी पाटील आघाडीवर
कपिल पाटील - 9839 मते
बाळ्या मामा - 6862 मते
निलेश सांबरे - 7186 मते
मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम पहिल्या फेरीत आघाडीवर
मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम आघाडीवर, तर वर्षा गायकवाड पिछाडीवर
उज्ज्वल निकम (भाजप) - १९ हजार १२१
३९०८ मतांनी आघाडीवर
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - १५ हजार २१३
नोटा - ४२५ मते
शेअर बाजारावर लोकसभा निकालाचा परिणाम
बाजार उघडताच सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला
निफ्टीमध्ये 550 अंकांची घसरण
मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर
मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर
सुरुवातीच्या कलांमध्ये राहुल शेवाळे यांना 6722 मते, तरअनिल देसाई यांना 1106 मते
मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर
मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर
सुरुवातीच्या कलांमध्ये राहुल शेवाळे यांना 6722 मते, तरअनिल देसाई यांना 1106 मते
कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पिछाडीवर
अभिजीत बिचुकले यांना केवळ 7 मते
शिवसेना - डॉ. श्रीकांत शिंदे - 5043 मते
ठाकरे गट- वैशाली दरेकर - 2950 मते
ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर, ठाकरे गटाचे राजन विचारे पिछाडीवर
ठाणे लोकसभा मतदारसंघ
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर
ठाकरे गटाचे राजन विचारे पिछाडीवर
नरेश म्हस्के 613 मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत पोस्टल मतदानात 146 मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत पोस्टल मतदानात 146 मतांनी आघाडीवर
मुंबईत मतमोजणीदरम्यान चुरस वाढली
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात चुरस वाढली
सुरवातीला भाजपचे उज्वल निकम होते, आता वर्षा गायकवाड आघाडीवर
मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर यांची आघाडी कायम तर रविंद्र वायकर पिछाडीवर
मुंबई उत्तरमधून भाजपचे पियूष गोयल यांची आघाडी कायम
उत्तर मुंबईतून भाजपचे उमेदवार पियुष गोयल आघाडीवर
उत्तर मुंबईतून भाजपचे उमेदवार पियुष गोयल आघाडीवर
मुंबई उत्तर मध्यमधून बॅलेट मतदानात उज्ज्वल निकम आघाडीवर
मुंबई उत्तर मध्यमधून बॅलेट मतदानात उज्ज्वल निकम आघाडीवर
मुंबई उत्तर पश्चिम बॅलेटमध्ये अमोल कीर्तीकर आघाडीवर
मुंबई उत्तर पश्चिम बॅलेटमध्ये अमोल कीर्तीकर आघाडीवर
नवी मुंबईत झळकले सातारा लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर्स
नवी मुंबईत झळकले सातारा लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर्स.
कोपरखैरणे येथील तीन टाकीजवळ शशिकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स.
मतमोजणी आधीच बॅनर झळकल्याने चर्चा.
मुंबईत थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात
मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मतदार संघाच्या स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या.
थोड्याच वेळात पोस्टल मत मोजणीला सुरूवात होणार.
मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर सुनेत्रा पवार यांचे विजयाचे बॅनर लागले
मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले
मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी केल्यामुळे मतदारांचे मानले आभार
निकालाआधी लावण्यात आले बॅनर्स
इंडियाची गॅरंटी कोणाला? सर्वात जलद पण अचूक निकाल NDTV मराठीवर
देशाची गॅरेंटी कुणाला? जलद आणि अचूक निकाल पाहा
मतमोजणी नेमकी होते कशी? स्ट्राँग रुममधील प्रक्रिया कशी असते?
मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होते. सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटची मोजणी होते. त्यानंतर लगेचच ईव्हीएममधील मतांचा मोजणी सुरु होते. जवळपास तासाभरानंतर कल सुरु होता.
ठाण्यात मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्यात चुरशीची लढत आहे. मतमोजणी घोडबंदर रोडवरील होरायझन या शाळेत होत आहे. दरम्यान कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडेल.
डोंबिवलीत संत सावताराम क्रीडा संकुलमध्ये होणार मतमोजणी
डोंबिवलीत संत सावताराम क्रीडा संकुलमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे.