विधानपरिषद निवडणूक निकाल : मुंबईत उबाठाची सरशी, परब, अभ्यंकर विजयी

Maharashtra Legislative Council Election Results 2024 : विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Maharashtra Legislative Council Election Results 2024 : विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.  मुंबईतील पदवीधर निवडणुकीत अनिल परब यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव केला. तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात ज.मो. अभ्यंकर विजयी झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री अनिल परब यांनी किरण शेलार यांचा 26 हजार 12 मतांनी पराभव केला. परब यांना 44 हजार 784 तर शेलार यांना  18 हजार 772 मतं मिळाली. हा विजय शिवसेनेचा , उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी विजयानंतर व्यक्त केली. मुंबईत शिवसेना आहे. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून परब विजयी झाले.

Advertisement

'मुस्लीम मतदार तपासा'

पदवीधरांची यादी पाठवून देतो त्यात किती मुस्लीम आहेत ते बघा आणि नंतर माझ्याशी बोला, असा टोलाही परब यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विजयी झाले होते, असा दावा भाजपानं केला होता. त्यावर परब यांनी हे उत्तर दिलं. 

Advertisement

( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )
 

या निवडणुकीत नोटा नसतात. आशिष शेलार आमदार आहेत त्यांना कळायला हवं, त्यांचा क्लास घ्यावा लागेल. त्यांच्यावर मानसिक दबाव असेल, असं परब यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांना आधीच सगळं कळलेलं असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान मुंबईतील शिक्षक मतदारसंघाची निवडणुक चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत ज.मो. अभ्यंकर यांनी शिक्षक भारतीच्या सुभाष मोरे यांचा पराभव केला. 
 

Advertisement