महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात 15 व्या फेरीपर्यंतची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अनेक उमेदवारांनी मोठी लीड घेतली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित...
सांगली लोकसभेच्या 13 व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 55 हजार 316 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर.
नंदुरबार लोकसभेच्या 10 व्या फेरीअंती..
काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 319600
भाजप :- डॉक्टर हिना गावित :- 222770
10 फेरीत काँग्रेसचे गोवाल पाडवी 96830 मतांनी आघाडीवर....
एकूण मतदान :- 568581
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे उमेदवार मविआ संजय देशमुख यांना 12 व्या फेरीअंती 2 लाख 64 हजार 318 मतं मिळाली तर महायुतीच्या राजश्री पाटील यांना 2 लाख 19 हजार 558 मतं मिळाली. संजय देशमुख यांनी 44 हजार 760 लीड घेतलं आहे.
हे ही वाचा - महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर
धाराशिवमध्ये तेराव्या फेरी अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर यांना 132858 मतांची आघाडी मिळाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजपाच्या स्मिता वाघ 374801 तर उद्धव ठाकरे गटाचे करन पवार यांना 227722 मतं मिळाली असून स्मिता वाघ 147079 मतांनी आघाडीवर आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांना 240663 मतं मिळाली असून भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 145027 मतं मिळाली आहेत. प्रतिभा धानोरकर या 95,636 मतांनी आघाडीवर आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी 45 हजारांची आघाडी घेतली आहे.
उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
महायुती 3 जागांवर आघाडी, महाविकासआघाडी 5 जागांवर आघाडी
नाशिक -
राजाभाऊ वाजे - ठाकरेंची सेना आघाडी
हेमंत गोडसे - शिंदेंची शिवसेना पिछाडीवर
दिंडोरी -
भास्कर भगरे - पवारांची राष्ट्रवादी आघाडी
डॉ भारती पवार - भाजप पिछाडीवर
अहमदनगर -
सुजय विखे - भाजप आघाडीवर
निलेश लंके - पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर
धुळे -
डॉ सुभाष भामरे - भाजप पिछाडीवर
शोभा बच्छाव - काँग्रेस आघाडीवर
जळगाव -
स्मिता वाघ - भाजप आघाडी
करण पवार - ठाकरेंची शिवसेना पिछाडीवर
रावेर -
रक्षा खडसे - भाजप आघाडीवर
श्रीराम पाटील - पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर
नंदुरबार -
गोवाल पाडवी - काँग्रेस आघाडीवर
डॉ हिना गावीत - भाजप पिछाडीवर
शिर्डी -
भाऊसाहेब वाघचौरे - ठाकरेंची सेना आघाडीवर
सदाशिव लोखंडे - शिंदेंची शिवसेना पिछाडीवर