Mahayuti News: एकनाथ शिंदेंना फडणीवासांचा पुन्हा एकदा शह! दबावा पुढे न झुकता जागा वाटपात सरशी

शिंदे यांची सेना आता ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा लढणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली. तेव्हा पासून महायुतीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी पाच किंवा सहा जागा मिळायला हव्यात असा आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीवारी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव ही निर्माण केला होता. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिंदेंची मागणी पूर्ण होईल अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात फडणवीस कोणत्या ही दबावाला बळी न पडता त्यांनी शिंदेंनाच शह दिल्याचं जागा वाटपावरून वाटत आहे. जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे.  

एकनाथ शिंदे हे  17 पैकी 6 जागी आग्रही होते. त्यानंतर शिंदे यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. त्यात दबाव तंत्र असल्याचं बोललं जातं. यातून किमान पाच जागा द्याव्यात असा शिंदेंचा प्रयत्न होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा राजकीय डाव उलटवला आहे. भाजप सर्वाधिक 11 जागा लढणार आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेला 4 जागा दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात दोन जागा पडणार आहेत. रायगड आणि पुणे अशा दोन जागा राष्ट्रवादीला मिळतील.  

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे आमिष! 20 कोटी 50 लाखांची मागणी, टोकन म्हणून 1 कोटी, भाजपच्या...

शिवसेनेला नाशिकसह  संभाजीनगर विधान परिषदेची जागा हवी होती. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठी समोर फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांनी संभाजीनगरची जागा देऊ नये असं ठाम पणे सांगितले. पक्षाश्रेष्ठींनाही त्यांनी हे पटवून दिली. त्यात बरोबर शिंदेंना पाच नाही तर चारच जागा दिल्या पाहीजेत असं ही सांगितलं. त्यामुळे शिंदेंना अपेक्षित असलेल्या जागा मिळणार नाहीत हे जवळपास निश्चत झाले आहे. एकनाथ शिंदे यांची सेना आता ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा लढणार आहे. तर एनसीपी रायगड आणि पुणे जागा लढवणार आहे. उर्वरित सर्व जागा भाजपा लढवणार आहे. 

महायुतीचे  विधान परिषद जागावाटप

11-4-2 चे सूत्र

  • भाजप -11
  • शिवसेना - 4
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 2

भाजप

1) सोलापूर
2) जळगाव
3) भंडारा  - गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती
6) धाराशिव - लातूर - बीड
7) नागपूर
8) छ.संभाजी नगर  - जालना
9) अहिल्यानगर
10) सांगली - सातारा
11) नांदेड

शिवसेना

1) ठाणे
2) नाशिक
3) परभणी
4) यवतमाळ

 राष्ट्रवादी काँग्रेस

1) कोकण
2) पुणे