लोकसभा निवडणुकीचा आता एकच टप्पा शिल्लक आहे. चार जून रोजी निकाल जाहीर होती. राज्यातील 48 जागांचं मतदान पूर्ण झालंय. राज्यातील मतदान संपलं असलं तरी राजकीय वातावरण शांत नाही. सध्या सुरु असलेल्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धमाका केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले तटकरे?
पवारांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
आगामी काळात देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं. राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना पवार यांनी हे वक्तव्य केल्यानं जोरदार खळबळ उडाली होती. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं लावण्याचा प्रयत्न करत होता. सुनील तटकरे यांच्या दाव्यानंतर पवारांचं ते वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
( नक्की वाचा : 'मी सुप्रियाताईंमुळे पक्ष सोडला', पवारांच्या 'लेडी जेम्स बॉन्ड'नं सांगितली परिस्थिती )
पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल”, असं शरद पवार म्हणाले होते., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, असं पवारांनी सांगितलं होतं. या विषयावर जोरदार गदारोळ उडाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं होतं.
( नक्की वाचा : Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात' )
राशपचा पलटवार
सुनील तटकरेंच्या वक्तव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं उत्तर दिलंय. 4 जूननंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहे. 4 जूननंतर जितदादांची नौका ही बुडणार आहे. आणि त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत. जे लोक शरद पवार साहेबांवर सिल्वर ओक वर प्रेम करतात तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत. जे जाणारे होते ते आता गेलेले आहेत. त्यामुळे अजून कोणी जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी स्पष्ट केलं आहे.