जाहिरात
Story ProgressBack

Maval Lok Sabha 2024 : श्रीरंग बारणे हटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे दणक्यात एन्ट्री घेणार?

शिवसेना ठाकरे गटाने येथे गद्दार विरुद्ध निष्ठावंत असाच प्रचार केला. श्रीरंग बारणे यांच्यावर गद्दार असा शिक्का मारत त्याच्या एकनिष्ठतेवर संशय निर्माण करत निवडणूक भावनिक करण्यावर शिवसेना ठाकरे गटाने भर दिला.

Read Time: 3 mins
Maval Lok Sabha 2024 : श्रीरंग बारणे हटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे दणक्यात एन्ट्री घेणार?

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून दोन टर्म खासदार राहिलेले श्रीरंग बारणे मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

मतदानानंतर श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे या दोन्ही उमेदवारांनी लाखोंच्या मताने विजयाचा दावा केला आहे. मात्र पनवेल, कर्जतमधील मतदार कुणाला कौल देतात यावर विजयाचं गणित अवलंबून आहे. तसेच यंदा बदलेली राजकीय परिस्थिती कुणाच्या पथ्याणार हे पाहावं लागेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गटाने येथे गद्दार विरुद्ध निष्ठावंत असाच प्रचार केला. श्रीरंग बारणे यांच्यावर गद्दार असा शिक्का मारत त्यांच्या एकनिष्ठतेवर संशय निर्माण करत निवडणूक भावनिक करण्यावर शिवसेना ठाकरे गटाने भर दिला. श्रीरंग बारणे यांच्याकडे दोन टर्मचा अनुभव असला तर यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराने प्रचारात त्यांना तगडी फाईट दिली.  

2019 मध्ये ही निवडणूक शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी झाली होती. यात श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा पराभव केला होता. त्यामुळे श्रीरंग बारणेंचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्न अजित पवार गटासमोर होता. त्यामुळे महायुतीची ताकद बारणेंच्या मागे उभी करण्यात मोठी कसरत करावी लागली. अखेर अजित पवारांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीची नेते देखील प्रचारात उतरले. 

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी?)

मॅच फिक्सिंग करु नका- अजित पवार

कुणीही गंमतजंमत करण्याचा प्रयत्न करु नका. नंतर सगळं कळतं. त्यामुळे तसंकाही केलं तर मी त्याचा बंदोबस्त करेन. मॅच फिक्सिंग करू नका नाही तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबीच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिली होती. मात्र बारणे यांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, ताकदीने काम केले नसल्याचा आरोप केला. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर याचा फटका श्रीरंग बारणे यांना बसू शकते. 

बारणे विरुद्ध वाघेरे

समोरच्या उमेदवार कोण हे मी ओळखत नाही. मी काय बीड, धाराशिव, बार्शीवरून आलो नाही, इथलाच आहे अशी टीकी श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर केली होती. तर कामच केलं नाही म्हणून अभिनेत्याला (गोविंदा) आणावं लागलं. अभिनेता ज्याचा प्रचारासाठी आला त्याचं नावाच विसरून गेला, अशी टीक संजोग वाघेरे यांनी बारणेंवर केली होती. 

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

मावळमधील प्रचाराचे मुद्दे

मतदारसंघातील नव्या रेल्वे मार्गिकेचा विस्तार, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पवना नदी प्रदूषण, आदिवासी पाड्यांचा विकास, पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका विस्तार, पर्यटन स्थळे विकसित करणे इत्यादी मुद्दे प्रचारात दिसून आले. 

मतदानाची टक्केवारी

मावळ लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 59.59 टक्के मतदान झाले  होते. यावेळी मतदानात घट झाली असून 54.87 टक्के मतदानाची नोंद झाली.

  • चिंचवड- 52.20 टक्के
  • कर्जत - 61.40 टक्के
  • मावळ- 55.42 टक्के
  • पनवेल -50.05 टक्के
  • पिंपरी - 50.55 टक्के
  • उरण - 67.07 टक्के

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

मावळ लोकसभेची विधानसभानिहाय बलाबल

  • चिंचवड विधानसभा- अश्विनी जगताप (भाजप)
  • कर्जत विधानसभा- महेंद्र थोरवे (शिवसेना शिंदे गट)
  • मावळ विधानसभा- सुनील शेळके (अजित पवार गट)
  • पनवेल विधानसभा - प्रशांत ठाकूर (भाजप) 
  • पिंपरी विधानसभा- अण्णा बनसोडे (अजित पवार गट)
  • उरण विधानसभा- महेश बालदी (अपक्ष)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाजपाच्या बालेकिल्ल्यात जरांगे फॅक्टरचा बोलबाला, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला?
Maval Lok Sabha 2024 : श्रीरंग बारणे हटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे दणक्यात एन्ट्री घेणार?
chhatrapati-sambhaji-nagar-aurangabad-lok-sabha-election-2024-imtiaz-jaleel-vs-chandrakant-khaire-vs-sandipan-bhumre-voting-percentage-prediction-and-analysis
Next Article
मराठवाड्याच्या राजधानीत अटीतटीचा सामना, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
;