जाहिरात

Mira Bhayandar Election : 'उत्तर भारतीय महापौर बनेल'; कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने वादाला ठिणगी 

भाजप नेते कृपाशंकर यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला आहे. 

Mira Bhayandar Election : 'उत्तर भारतीय महापौर बनेल'; कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने वादाला ठिणगी 

Mira Bhayandar Election : सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकीचं वारं जोराने वाहू लागलं आहे. तिकीट न मिळाल्याने असंतोष अन् काही ठिकाणी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यापूर्वीही 'महापौर कोण होणार' यावरुन राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. भाजप नेते कृपाशंकर यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. 

कृपाशंकर सिंह काय म्हणाले?

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचं मतदान १५ जानेवारीला होणार आहे. कृपाशंकर सिंह म्हणाले, मीरा भाईंदरमध्ये इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसेल, असा दावा कृपाशंकर सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट

नक्की वाचा - Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट

मनसेच्या कृपाशंकर सिंह यांना इशारा

'मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवणार' या कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याचा मनसेचा समाचार घेतला आहे. "तुम्ही चड्डी बनियन वर आलेले... आता महापौर बनण्याच्या भाषा करताय, हलवा आहे का..?" असा इशारा मनसेचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले, असं बोलताना लाज वाटत नाही का..? मुंबई आणि मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होणार आणि तो ही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शाखाली होणार. तुम्ही सभागृहाच्या आतमध्ये असाल, पण बाहेर रस्त्यावर आम्ही असू. धुमाकूळ घालू. या मुंबईची तुमच्यावर फार मोठी मेहेरबानी आहे. त्यामुळे मुंबईबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा.  त्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम करू नका. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा मनसेचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com