मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?

राज ठाकरे यांनी त्यांनीच केलेली आपली दोन विधाने खोडून काढली आहे. उरलेल्या दोन विधानांसंदर्भातील राज ठाकरेंची भूमिका मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी स्पष्ट होत जाईल.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर करण्यास राज यांनी सुरुवात केली होती. राज ठाकरे यांची हेटाळणी भूमिका बदलणारे नेते म्हणून त्यांचे विरोधक सातत्याने करत असता. राज यांनी अनेकदा त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिले आहे. पहिल्याच प्रयत्नात 13 आमदार निवडून आणणारा पक्ष असे अभिमानाने मिरवणाऱ्या मनसेची त्यानंतरची भूमिका बदलत गेलेली दिसली. किती उमेदवार द्यायचे या प्रश्नापासून मनसे निवडणूक लढवायची का या प्रश्नापर्यंत येऊन थांबली. जुलै महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. गेल्या 4 महिन्यात राज यांनी कशीकशी पावले टाकली याचा आढावा घेवूयात. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 
25 जुलै 2024 

मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी सगळ्या जागा लढणार नाही हे यातून स्पष्ट केले होते. त्यांच्या बोलण्यातून तेव्हा समज असा झाला होता की मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना काही करून सत्तेत बसवायचे आहे . यावर काही जण हसतील. पण त्यांना हसू द्या. निवडणूक निकालानंतर मनसेचे कार्यकर्ते सत्तेत असतील म्हणजे असतील. असं सांगितलं होतं.   

Advertisement

5 ऑगस्ट 2024

राज ठाकरेंनी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. सोलापूर इथे त्यांनी मनसेच्या पहिल्या दोन उमेदवारांची नावे ही जाहीर केली. त्यावेळी महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू होणे सोडाच, त्या गुऱ्हाळाचे शटरही उघडले नव्हते. एका अर्थाने उमेदवार जाहीर करण्यात मनसेने बाजी मारली होती. त्यावेळी वाटलं होतं की राज ठाकरे काही तरी नक्कीच वेगळा विचार करत आहेत.  

Advertisement

10 ऑगस्ट 2024

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेपूर्वी राज यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यावरूनही राज ठाकरेंनी विरोधकांना दम दिला. राज यांनी पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांपेक्षा मविआच्या नेत्यांवर जास्त टीका केली होती. त्यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर होता. माझ्या दौऱ्यादरम्यान या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, उद्या माझे मोहोळ उठले तर यांना निवडणुकीला एकही सभाही घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. असा राज यांनी बजावले होते. आरक्षणाच्या मुद्दावरून बोलताना त्यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटले होते की, 10 वर्ष केंद्रात मोदी बहुमताने पंतप्रधान होते. पवारांनी मोदींकडे तेव्हा मराठा समाजासाठी आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही. उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप सोबत नांदत होते याचीही त्यांनी आठवण करून दिली होती.  

Advertisement

14 ऑगस्ट 2024

पत्रकार परिषदेत राज यांनी शरद पवारांपेक्षा अजित पवार कसे वेगळे आहेत हे ठासून सांगितले. यानंतर मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. अमोल मिटकरींची गाडी फोडण्याच्या घटनेदरम्यान मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरली होती. 

24 ऑगस्ट 2024

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी  बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करताना टीका केली. मात्र त्यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने मविआ नेत्यांवरच राहिल्याचे दिसले होते. ज्यांनी बंद पुकारला होता, त्यांच्याही काळात या घटना घडल्या होत्या. आज जी प्रकरणे एकामागोमाग उघडकीस येत आहे त्यामागे काही राजकारण आहे का ? येणाऱ्या निवडणुका आहेत का ? निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा असे सुरू आहे. मविआ सरकारच्या काळात असे होतेच की, त्याचे काय करणार? असा प्रश्न त्यांनी केला होता.   

13 ऑक्टोबर 2024 

रोजी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, आगामी विधानसभेत मनसे ना आघाडीत जाईल ना युतीमध्ये जाईल. मात्र निकालानंतर मनसे हा सत्तेला पक्ष असेल. माझ्या कार्यकर्त्यांना मला सत्तेत बसवायचे आहे. यावेळी आपण नक्कीच सत्ते असू असेही राज म्हणाले होते. 

16 ऑक्टोबर 2024

राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा लढणार आहे असे जाहीर केले होते. 30 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख होती. हाती आलेल्या आकड्यांनुसार मनसेचे 138 उमेदवार निश्चित झाले होते. त्यापेक्षा जास्त उमेदवार भाजप लढवत आहे. भाजपने 152 उमेदवार निवडणुकीत उतरवलेत. वंचित बहुजन आघाडीने त्याहीपेक्षा जास्त उमेदवार दिले आहेत. वंचितने 189 उमेदवार निवडणुकीत उतरवलेत.

30 ऑक्टोबर 2024

राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यामध्ये माहीमसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिलीय. यावर फडणवीसांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देणार असे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही ती इच्छा आहे, असंही ते म्हणाले. अमित ठाकरेंच्या विरोधातील मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं जातील म्हणून त्यांनी उमेदवार दिला आहे. असे स्पष्टीकर फडणवीसांनी दिले होते. 

31 ऑक्टोबर 2024 

मनसेच्या दहीसरमधील उमेदवाराने गुजरातीमधून प्रचाराची पत्रके वाटण्यास सुरुवात केली. गुजरातीबहुल मतदारांनी यंदा आम्ही मनसेलाच मतदान करणार अशी भूमिका घेतल्याने, आणि या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या मोठी असल्याने आपण मराठीसोबतच गुजरातीमध्येही पत्रके छापल्याचे मनसेच्या उमेदवाराने म्हटले होते. दरम्यान राज ठाकरे यांनी 200 हून अधिक जागा लढवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी इतर पक्षांपेक्षा जास्त जागा लढवणार असे सांगितले. राज ठाकरे यांनी कोणाशीही युती, आघाडी करणार नाही असेही सांगितले. राज ठाकरे यांनी आपला पक्ष सत्तेतील पक्ष असेल असेही सांगितले. राज ठाकरे यांनी त्यांनीच केलेली आपली दोन विधाने खोडून काढली आहे. उरलेल्या दोन विधानांसंदर्भातील राज ठाकरेंची भूमिका मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी स्पष्टता येत जाईल.