फडणवीसांविरोधात मनसे उमेदवार देणार, नाव देखील झालं फिक्स

मात्र काही जागांवर मनसे उमेदवार देणार नाही हे पण स्पष्ट होते. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार रिंगणात उतरवणार की नाही याबाबत उत्सुकता होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार मनसेने राज्यात तयारीही सुरू केली आहे. शिवाय राज यांनी काही मतदार संघातील उमेदवारही घोषीत केले आहेत. जवळपास सर्व जागा लढवणार असल्याचे राज यांनी सांगितले होते. मात्र काही जागांवर मनसे उमेदवार देणार नाही हे पण स्पष्ट होते. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार रिंगणात उतरवणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र मनसेने फडणवीसांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्याचे नावही फायनल केल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भातील मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी त्याला दुजोराही दिला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या मतदार संघात राज यांचा शिलेदार उतरणार हे निश्चित झालं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र राज ठाकरे यांनी या मतदार संघातही उमेदवार देणार असल्याचे निश्चित केले आहे. फडणवीसां विरोधात मनसेकडून  तुषार गिरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या नावाची घोषणी होवू शकते असं विदर्भातील मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले आहे. राज ठाकरे नवरात्री उत्सवात उमेदवारी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'सांगली पॅटर्न'ची आठवण करुन द्या, शिवसेनेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे आदेश?

महाराष्ट्रमध्ये मनसे 288 पैकी 230 जागा लढवणार असल्याचेही राजू उंबरकर यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी या आधीही बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे मनसे कोणा बरोबरही युती करणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शिवाय आता तर थेट फडणवीसांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवला जाणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बरोबर महाविकास आघाडीला मनसे टक्कर देणार हे स्पष्ट आहे.  

Advertisement