Mumbai Municipal Corporation Election 2026 - Gujarati versus Gujarati : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ (BMC Election 2026) च्या प्रचाराचा रंग दिवसागणिक वाढत आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने उमेदवार आपआपल्या भागात जोरदार प्रचार करीत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये 'गुजराती विरुद्ध गुजराती' अशी लढत रंगणार आहे. प्रामुख्याने ज्या वॉर्डांमध्ये गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे, तिथे भाजपने (BJP) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) या दोन्ही पक्षांनी गुजराती चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे.
गुजराती विरुद्ध गुजराती थेट लढत (मुंबई महानगरपालिका २०२६)
प्रभाग क्रमांक - १०७ (सर्वसाधारण)
डॉ. नील किरीट सोमैया - भारतीय जनता पार्टी
वैशाली संजय सकपाळ - वंचित बहुजन आघाडी
इटोदिया सुनील हस्तीमल - अपक्ष
दिनेश शंकर जाधव - अपक्ष
ठाकरे गणेश प्रकाश - अपक्ष
शाह दिलीप जयंतीलाल - अपक्ष
शिगांडे आनंद लक्ष्मण - अपक्ष
प्रभाग क्र. १६
कांदिवली (चारकोप)
बीना दोशी (भाजप) विरुद्ध हेतल पटेल (शिवसेना - ठाकरे गट)
प्रभाग क्रमांक - ५५
गोरेगाव पश्चिम
हर्ष भार्गव पटेल - भारतीय जनता पार्टी
चेतन हरिशंकर भटट् - काँग्रेस
प्रभाग क्र. २१०
गिरगाव/खेतवाडी
आकाश पुरोहित (भाजप) विरुद्ध मिहिर कोठारी (शिवसेना - ठाकरे गट)
मुलुंड (प्रभाग १०७) येथे किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या रिंगणात आहेत. येथे मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी मतदारांच्या संख्येमुळे दोन्ही बाजू गुजराती मतांवर लक्ष केंद्रित करत आहेत. दहिसर (प्रभाग १): येथे शिवसेना (ठाकरे गट) कडून फोरम परमार यांच्या रूपाने तरुण गुजराती चेहरा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबई (प्रभाग २१०): गिरगाव-खेतवाडी भागात गुजराती व्यापारी मतदारांची संख्या मोठी असल्याने तिथे आकाश पुरोहित आणि मिहिर कोठारी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
