Nagpur Municipal Corporation Election 2026 : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री उशीराने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणाा हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भूषण शिंगणे हे प्रभाग क्रमांक ११ मधून भाजप उमेदवार आहेत.
नागपुरमधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रात्री 12 वाजे दरम्यान गोरेवाडा परिसरात कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले असता भूषण शिंगणे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून हल्ला केल्याची माहिती आहे. भूषण शिंगणे नागपूर भाजपचे प्रभाग ११ चे उमेदवार आहेत. नागपूरातील मेयो रुग्णालयात भूषण शिंगणे यांच्यावर उपचार सुरू आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आज राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान
राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. एकूण 2869 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.