Nagpur Municipal Corporation Election : पुष्पा वाघमारे चार मुलांची आई आहे. पुष्पा वाघमारे या नागपूर महानगरपालिका निवडणूक लढवित आहेत. मात्र निवडणुकीच्या कायद्यानुसार, दोनहून अधिक अपत्य असलेली व्यक्ती पालिका निवडणूक लढवू शकत नाही. १९९५ मध्ये महाराष्ट्रात पालिका, नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगित टाऊनशिप अधिनियम लागू झाला होता. ज्यानुसार, दोनहून अधिक अपत्य असलेले उमेदवार निवडणूक लढवू शकत नाहीत. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
शरद पवारांच्या पक्षाची उमेदवार...
पुष्पा वाघमारे या दक्षिण-पश्चिम नागपूरच्या वॉर्ड ३६ मधून शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीवरुन वाद निर्माण झाला होता. पहिल्यांदा निवडणूक लढवित असल्याकारणाने त्यांना नियमांची माहिती नव्हती, असा त्यांनी दावा केला आहे. मी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि पहिल्यांदा निवडणूक लढवित आहे. मला नियमांची माहिती नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. दोनहून अधिक अपत्य असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही हे मला आधीच माहिती असतं तर मी अर्ज केला नसता.
मागे हटणार नाही, पुष्पा वाघमारे ठाम
पुष्पा याबाबत म्हणाल्या, माझ्या अर्जाचा स्वीकार करण्यात आला आहे. यात माझी काहीही चूक नाही. काहीही झालं तरी मी निवडणूक लढवणार. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, प्रशासकीय दृष्टिकोनातून, निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. त्याविरुद्ध अपील फक्त न्यायालयातच करता येते. आम्ही स्वतःहून निर्णय बदलू शकत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
