नवनीत राणा अडसूळांच्या भेटीला, चर्चा काय झाली?

Advertisement
Read Time2 min
नवनीत राणा अडसूळांच्या भेटीला, चर्चा काय झाली?
अमरावती:

अमरावती लोकसभेच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी आज ( बुधवार) शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. राणा यांना उमेदवारी देण्यास अडसूळ यांन टोकाचा विरोध केला होता. ही जागा शिवसेनेला मिळावी अशी त्यांची मागणी होती. जर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार नाही असं अडसूळ पिता पुत्राने आधीच जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर राणा यांनी अडसूळांची भेट घेतली. या भेटीत अडसूळांनी राणांना काय आश्वासन दिलं याची चर्चा सध्या सुरू आहे. 
   
राणा - अडसूळ भेटीत चर्चा काय? 
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी रामनवमीच्या दिवशी अडसूळ कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांची माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची भेट झाली. यावेळी अडसूळ दाम्पत्याने राणा दाम्पत्याचे स्वागत केले. यावेळी राणा दाम्पत्याने प्रचारात सहभागी व्हावं आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यात हातभार लावाला असं आवाहन केलं. अडसूळ यांनीहा याबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते सध्या स्टँडबायवर आहेत. आम्ही सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ असं त्यांनी सांगितलं. शिवाय राजकारणात कोणीही कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे स्पष्ट करताना लवकरच निर्णय होईल असेही सांगितले.  

Photo Credit: फोटो सौजन्य - नवनीत राणा फेसबूक पेज

आनंदराव अडसूळांची भूमिका गुलदस्त्यात? 
अभितीत अडसूळ यांची जरी राणा यांची भेट झाली असली तरी माजी खासदार आनंदराव अडसूळांची मात्र भेट होऊ शकली नाही. आनंदराव अडसूळ यांनी राजकारण सोडेन पण राणांचा प्रचार करणार नाही हे याआधीच जाहीर केले आहे. मात्र आनंदराव हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्यात फिरत आहेत. त्यामुळे तेही आपली भूमिका आगामी काळात जाहीर करतील असे स्पष्ट केले. 

भेटीनंतर काय म्हणाले रवी राणा?  
महायुती म्हणून आम्ही सर्व एक आहोत अशी प्रतिक्रीया भेटीनंतर आमदार रवी राणा यांनी दिली. मोदींनी चारशे पारचे लक्ष ठेवले आहे. ते पुर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय आनंदराव अडसूळांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो होते. राजकारणात कायम कोणी शत्रू नाही किंवा मित्रही नाही असेही ते म्हणाले. दरम्यान या भेटीनंतर तरी अडसूळांची नारीज दुर होईल आणि ते प्रचारात सक्रीय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: