महामंडळं दिली, पण भाजप, राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यांनी नाकारली, आता थेट मैदानात उतरणार?

27 महामंडळावरच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात कोणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष करत, कोणाला सदस्यपद देण्यात आले. असं असलं तरी 4 बड्या नेत्यांनी महामंडळे नाकारली आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारे महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या करून नाराजांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. अधिकृत उमेदवार किंवा मित्र पक्षाच्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये यासाठी ही रणनिती आखली गेली. त्यानुसार 27 महामंडळावरच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात कोणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष करत कोणाला सदस्यपद देण्यात आले. असं असलं तरी 3 बड्या नेत्यांनी महामंडळे नाकारत थेट बंडाचं निशाण फडकावलं आहे. तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महामंडळ स्विकारण्यास नकार दिला आहे.  त्यामुळे महायुतीत टेन्शन मात्र वाढलं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन पक्ष आहे. शिवाय काही घटक पक्ष आहेत. त्यामुळे काही मतदार संघात तिन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे नाराजांना आमदारकी ऐवजी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. काहींनी ते निमुटपणे स्विकारले. तर काहींनी हे स्विकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे आणि हिंगोलीचे भाजप नेते रामराव वडकुते यांचा समावेश आहे. 

ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता

प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर आमदार होते. त्यांना भाजपकडून पंढरपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी हवी होती. मात्र इथे समाधान अवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना परिचारक यांचा विरोध आहे. त्यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी मिळाली अशी त्यांची मागणी आहे. त्यांचा विरोध लक्षात घेता त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदावर परिचारक यांची नियुक्त करण्यात आली. मात्र परिचारक यांनी हे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. 

ट्रेंडिंग बातमी - नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?

परिचारक यांच्या बरोबर भाजपचे दुसरे नेते रामराव वडकुते यांनीही महामंडळाचे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात वडकुते यांची चांगली ताकद आहे. त्यांनाही विधानसभा निवडणूक लढायची आहे. मात्र कोणत्या पक्षाकडून लढायची हे त्यांनी अजूनही जाहीर केलेले नाही. मात्र महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर झालेली नाही. तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महामंडळाची नियुक्ती स्विकारण्यास असहमती दर्शवली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - दाऊदबरोबर संबंध असल्याचा आरोप,नंतर जेलवारी, आता लेकीसह बापालाही उमेदवारी

भाजप प्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातही महामंडळावरून नाराजी आहे. अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनाही महामंडळ देण्यात आले होते. मात्र त्यांनी ही ते स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यांना कृषी शिक्षण, संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपण मावळ विधानसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहोत असे ठाम पणे सांगितले आहे. त्यांचा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना विरोध आहे. उमेदवारी न मिळाल्यास भेगडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. विधानसभेला दगाफटका होवू नये म्हणून निवडणुकीच्या तोंडावर  16 ऑक्टोबर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या.