जाहिरात

नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?

बडनेरा विधानसभा मतदार संघावर रवी राणा यांची चांगलीच पकड आहे. सलग तीन वेळा ते या मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.

नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?
अमरावती:

लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. शिवाय त्यांच्या विरोधात काम करणार अशीही भूमीका घेतली होती. महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी तर त्यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवारही रिंगणात उतरवला होता. आता विधानसभा निवडणुकीलाही त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. बडनेरा मतदार संघात नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. शिवाय या मतदार संघातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बडनेरा विधानसभा मतदार संघात रवी राणा हे आमदार आहेत. रवी राणा यांचा भाजपला पाठींबा आहे. ते सध्या महायुतीत आहे. त्यामुळे बडनेरा विधानसभा मतदार संघ हा रवी राणांना मिळेल अशी चिन्ह आहेत. मात्र रवी राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. रवी राणा यांनी मतदार संघात काही कामे केलेली नाहीत. त्यांचा इतिहास हा आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पायऱ्या झिझवण्यात गेला आहे. आता ते भाजपच्या पायऱ्या झिझवत आहेत. त्यांच्या बाबत असंतोष आहे असा हल्लाबोल माजी महापौर चेतन गांवडे आणि भाजपचे महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता

बडनेरा मतदार संघातून रवी राणा यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. या मतदार संघात महायुतीचा उमेदवार हा भाजपचाच असेल असा दावाही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रवी राणा यांना त्यांचा पराभव मतदार संघात दिसत आहे. इथे निवडून येणारा पुढचा आमदार हा कमळ चिन्हावरचा असेल असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रवी राणा यांना कोणत्याही स्थिती उमेदवारी मिळणार नाही असेही ते म्हणाले. लोकसभेलाही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. मात्र तरीही नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.  

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?

दरम्यान रवी राणा यांनाही आता विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार श्रीकांत भारतीय व भाजप नेते तुषार भारतीय यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रवी राणा यांनी केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. श्रीकांत भारती हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत हे राणा विसरले आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभे नंतर आता विधानसभेला ही राणांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष पत्करावा लागत आहे. हा विरोध असाच कायम राहील्यास रवी राणा यांच्या पुढील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - तीन मित्रांना पत्नीच्या बेडरूममध्ये पाठवलं अन्..., पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील लज्जास्पद घटना

बडनेरा विधानसभा मतदार संघावर रवी राणा यांची चांगलीच पकड आहे. सलग तीन वेळा ते या मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. मात्र मत विभाजनामुळे त्यांना नेहमीच फायदा झाला आहे. काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी त्यांना दोन वेळा चांगली टक्कर दिली होती. शिवसेनेच्या प्रिती बंड यांनीही राणा यांना जोरदार टक्कर दिली होती. त्याच यावेळच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील असे बोलले जात आहे. शिवाय राण तिन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदार संघात वातावरण असल्याचीही चर्चा आहे. त्यात भाजपचा अंतर्गत विरोध यामुळे राणा यांची जागा पत्नी प्रमाणेच धोक्यात असल्याची चर्चा मतदार संघात आहे.    

Previous Article
तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता
नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?
mumbai-36- Assembly-constituency-mahayuti-bjp-contest-22-seats-eknath-shinde-gets-11-Ajit-pawar-3
Next Article
मुंबईमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदेंची सेना की भाजप? राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?