NDTV BMC Power Play: 'मुंबईत आहोत की कराची पाकिस्तानमध्ये अशी स्थिती' नितेश राणे असं का म्हणाले?

सध्याच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंची हवा गेली.काँग्रेसला दुर्बिणने शोधावी लागते. शरद पवारांचा पक्ष गायब आहेत. त्यामुळे माध्यमांना कंटेट देण्याचे काम आमच्यावर आले आहे असं राणे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 4 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नितेश राणे म्हणाले की हिंदूत्व ही आमची ओळख आहे.
  • मुंबईचा विकास भाजपच्या नेतृत्वाखाली झाला असून कोस्टल रोड आणि मेट्रोसारखे प्रकल्प फडणवीसांच्या काळात सुरू झाले
  • मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची लोकसंख्या वाढल्याने स्थानिक मुंबईकरांवर अन्याय होत आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

हिंदूत्व हा आमच्यासाठी विषय नाही. निवडणुकीसाठी हा विषय असू शकत नाही. हिंदूत्व ही आमची ओळख आहे. तेच आमचे राष्ट्रीयत्व आहे. इथं होणारी प्रत्येक निवडणूक ही हिंदूंसाठी महत्वाची आहे. म्हणून आम्ही हिंदूत्वाचा विषय घेवून जनते समोर जात आहोत असं मत्सविकास मंत्री आणि भाजप नेते  नितेश राणे यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NDTV नेटवर्कतर्फे  आयोजित 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकार टाकला. शिवाय ठाकरे बंधूंवरही निशाणा साधला. 

मुंबईचा विकास भाजप मार्फत करण्यात आला. मग तो कोस्टल रोड असेल, मेट्रो ट्रेन असेल हे प्रकल्प फडणवीसांच्या कार्यकाळात मार्गी लागले असा दावा ही यावेळी राणे यांनी केला. मुंबईचा विकास कुणासाठी करायचा असा प्रश्न करत ते म्हणाले की मुंबईचा विकास हा मुंबईकरांसाठीच असला पाहीजे. तो बांगलादेशी आणि रोहिंग्यासाठी नको. या लोकांमुळे मुळ मुंबईकर मुंबईच्या बाहेर पडत आहेत. ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्याचा उपभोग हे लोक घेत आहेत. मुंबईत काही ठिकाणी तर हे कराची आहे की पाकिस्तान अशी स्थिती निर्माण झाली आहे असं ही ते यावेळी म्हणाले. या सर्व बांगलादेशीना डिपोर्ट करणे गरजेचे आहे. त्यांच्या सर्व सोईसुविधा बंद केल्या पाहीजेत. जर असं केलं तर ते आरोआप मुंबईत राहाणार नाहीत असं ही ते म्हणाले.    

नक्की वाचा - NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन

यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर ही टिका केली.  बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार आहेत. जे आपल्याला खरे वारसदार समजतात, ते हिंदूत्वावर बोलू पाहत नाहीत. ते हिंदूत्वाची खिल्ली उडवतात. महाकुंभची खिल्ली त्यांनीच उडवली असं ही नितेश राणे म्हणाले. ठाकरे ब्रँड नाही असं कुणी बोलत नाही. बाळासाहेबांचा हिंदूत्व ब्रँड हा मोठा होता. तो या दोन भावांमध्ये दिसत नाही. बाळासाहेबांच्या पुढच्या पिढीने ना हिंदूत्व जपलं ना ठाकरे ब्रँड जपला. बाळासाहेबांचा वारसा दोन बंधू पुढे घेवून जात आहेत असं तुम्हाला तरी वाटतं का असा सवाल त्यांनी केला. 

नक्की वाचा - NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं

बाळासाहेबांची 92-93 साली झालेल्या दंगलीत मुंबईतल्या मराठी आणि हिंदूंना वाचवले. अशा वेळी बाळासाहेबांचे हिंदूत्व पुढे नेणं गरजेचं होतं. पण चंगेज मुलतानाला पुढे करून, याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून उद्धव ठाकरे काय करत आहेत असा सवाल त्यांनी यावेळी केला. उद्धव हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब ठाकरे केले होते असं ही ते म्हणाले. बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढले असते. लोकसभेसा त्यांना सर्व मुस्लीम मतं मिळाली. आता मुंबईत त्यांना तेच हवे आहे असा आरोप ही राणे यांनी केले. 

Advertisement

नक्की वाचा - NDTV BMC Power Play: 'मराठी अस्मिता आम्हाला शिकवू नये, ठाकरेंची युती सत्तेसाठी", पूनम महाजन यांचा टोला

लंडन- न्यूयॉर्क शहरांची सध्या अधोगती होत आहे. तिथले ख्रिश्चन समाज अडचणीत आहेत. तशीच स्थिती मुंबईत होता कामा नये असं ते म्हणाले. त्यामुळे मुंबईतल्या हिंदूंना जागृत करत असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईचा किंवा इतर ठिकाणचा महापौर कोण होणार हे कृपाशंकर सिंह ठरवणार नाहीत. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे महत्वाचे आहे. कुणी उठणार आणि काही बोलणार असं होणार नाही. आमचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत आहेत असं ही ते म्हणाले. भाजप एमआयएम युतीवर हे ते बोलले. पक्षात काही असे काही लोक आहेत ज्यामुळे संपूर्ण पक्षाकडे बोट दाखवले जाते. पण असे लोक बाहेर काढले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला

सध्याच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंची हवा गेली.काँग्रेसला दुर्बिणने शोधावी लागते. शरद पवारांचा पक्ष गायब आहेत. त्यामुळे माध्यमांना कंटेट देण्याचे काम आमच्यावर आले आहे. आधी राणे बंधूंनी दिला आता गणेश नाईक ते काम करत आहेत. पण आमच्यात सकारात्मक स्पर्धा आहे. सोळा तारखेला आम्ही एकत्रीत गुलाल उधळणार आहोत असं ही ते म्हणाले. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेळे खान की बाण अशी घोषणा होती. तिथे ठाकरेंना खानाला मांडीवर घ्यावं लागत आहे. ज्याने छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध केला त्यालाच उमेदवारी द्यावी लागली. राज ठाकरे जरी उद्धव यांच्या सोबत असले तरी ते त्यांच्या सोबत तेवढे सहज नाहीत असा दावा राणे यांनी केला.   

Advertisement