जाहिरात

NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन

पायाभूत सुविधा, वेगवान प्रवास आणि प्रत्येकाला हक्काचे घर यावर आधारित मुंबईच्या विकासाचे व्हिजन त्यांनी 'NDTV BMC Power Play' च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले.

NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन

CM Devendra Fadnavis NDTV Marathi BMC Power Play: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पाच वर्षांतील 'नव्या मुंबई'चा संपूर्ण आराखडा मांडला आहे. पायाभूत सुविधा, वेगवान प्रवास आणि प्रत्येकाला हक्काचे घर यावर आधारित मुंबईच्या विकासाचे व्हिजन त्यांनी 'NDTV BMC Power Play' च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले.

"गेल्या 10 वर्षांत आम्ही मुंबईला बदलले आहे, पण पुढील 5 वर्षे मुंबईच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा विकासाचा टप्पा असेल," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना भविष्यातील शहराचे दर्शन घडवले. वाहतूक कोंडीतून मुक्ती आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांचा कायापालट हे त्यांच्या व्हिजनचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत.

NDTV BMC Powerplay LIVE Updates: उद्धव ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा: CM देवेंद्र फडणवीस

प्रत्येकाला हक्काचे घर, रिडेव्हलपमेंटला वेग

मुंबईतील घरांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बीडीडी चाळींचा विकास करून रहिवाशांना मोठी घरे दिली आहेत. अभ्युदय नगर आणि पत्रा चाळीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. सर्वात मोठ्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून पात्र व्यक्तींना तिथेच घरे मिळतील, तर अपात्र नागरिकांनाही घरांपासून वंचित ठेवले जाणार नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजनांना अधिक वेग देऊन मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

प्रवासाचा वेळ तासांवरून मिनिटांवर

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं की, मुंबईकरांचा रोज 4-5 तास वेळ प्रवासात  जातो. मुंबईच्या वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी काय-काय केलं आणि काय करणार हे सांगताना फडणवीस यांनी म्हटलं की, दिल्लीला 20 वर्षे लागली, पण आम्ही मुंबईत 436 किमीचे मेट्रो नेटवर्क वेगाने उभारत आहोत. पुढील वर्षापर्यंत 200 किमीचे काम पूर्ण होईल.

बोगद्यांचे जाळे 

मुंबईचा पूर्व-पश्चिम भाग जोडण्यासाठी ठाणे-बोरीवली बोगद्याची निर्मिती केली जात आहे. ज्यामुळे 23 किमीचे अंतर 13 किमीवर येईल, ज्यामुळे दीड तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत होईल. तसेच मुलुंड ते गोरेगाव लिंक रोडचे काम सुरू आहे.  याशिवाय ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील तान कमी करण्यासाठी कोस्टल रोड उभारला जात आहे. जो वर्सोवा, दहिसर ते भाईंदरपर्यंत विस्तारित केला जात आहे.

NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं

 वॉटर टॅक्सी आणि बेस्ट बसचा विस्तार

मुंबईच्या किनारपट्टीचा वापर करून 21 ठिकाणी जेट्टी उभारल्या जात आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट ते गेट वे ऑफ इंडिया हा प्रवास आता वॉटर टॅक्सीने अवघ्या काही मिनिटांत करता येईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या 5 हजारांवरून 10 हजारांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

मुंबई लोकलमध्ये मोठे बदल

मुंबई लोकलविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे नियोजन आहे. यामुळे दरवाजात लटकून होणारे अपघात थांबतील आणि प्रवास अधिक सुसह्य होईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com