भर व्यासपीठावर महिलाराज भिडले; 'शिंदे सेने'वरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये तू तू मैं मैं

NDTV BMC Power Play : भरव्यासपीठावर शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये तू तू मैं मैं  सुरू होती. इतकी की मुंबई महानगरपालिकेतील मुद्दे बाजू ठेवत भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरच त्यांच्यातील वाद रंगत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sheetal Mhatre vs. Sushma Andhare : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर NDTV नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमात मुंबईतील विविध पक्षांच्या महिला नेत्या एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र होतं. NDTV नेटवर्कच्या कार्यक्रमातील  'महापालिकेतील महिलाराज' या सत्राअंतर्गत शिवसेना (शिंदे गट) शीतल म्हात्रे, अजित पवार गटाच्या सना मलिक, उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, काँग्रेसच्या संध्या सव्वालाखे सामील झाल्या. यावेळी महानगरपालिकेच्या मुद्द्यांऐवजी वेगळ्याच मुद्द्यांवर त्यांच्यात तू तू मै मै झाल्याचं पाहायला मिळालं. 

सुषमा अंधारे यांनी बोलताना 'शिंदे सेना' असा उल्लेख केला. त्यावर शीतल म्हात्रे संतापल्या. शिंदे सेना नव्हे शिवसेना असा उल्लेख करण्यासाठी सुषमा अंधारे यांच्यावर दबाव आणू लागल्या. दुसरीकडे सुषमा अंधारे मात्र 'शिंदे सेना' या शब्दावर ठाम राहिल्या आणि कारणमीमांसा देऊ लागल्या. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उच्चारताना वंदनीय असा शब्द वापरला होता. शीतल म्हात्रेंना हा ही शब्द खटकला. त्यांनी पुन्हा सुषमा अंधारे यांना बोलताना रोखलं आणि हिंदुहृदयसम्राट म्हणा यासाठी जोर लावला. 

नक्की वाचा - 'युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं'; अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य

भरव्यासपीठावर शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये तू तू मैं मैं  सुरू होती. इतकी की मुंबई महानगरपालिकेतील मुद्दे बाजू ठेवत भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरच त्यांच्यातील वाद रंगत होता.