Vinod Tawde on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपवर गंभीर आरोप केलेत. भाजपने पिंपरी-चिंचव़ड पालिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला असून रस्तेबांधणीपासून कुत्र्यांची नसबंदी यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपवर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर अखेर मौन सोडलं आहे. विनोद तावडे म्हणाले, भाजप शिवसेनेसोबत युतीत असताना निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढवीत होतो. मराठी बहुत भागात शिवसेना आणि इतर भागात भाजप निवडणूक लढवित होती. मात्र त्यामुळे इतर भागात पक्षाची वाढ फार होऊ शकली नाही. दुसरीकडे अजित पवारांची निवडणुकांकडे पाहण्याची भूमिका वेगळी आहे. अजित दादांनी महायुती आणि आघाडीत धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांना स्थानिक स्तरावर पक्ष वाढवायचा आहे. भाजपविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपावर विनोद तावडे म्हणाले, प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वजण जिद्दीने लढतायेत. आणि लढताना अशी वक्तव्यं होत असतात.
NDTV 'बीएमसी पॉवर प्ले' या कार्यक्रमात एका वाक्यात विनोद तावडेंनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. 'मुंबईच्या महासंग्रामा'वर प्रकाश टाकण्यासाठी NDTV नेटवर्कतर्फे 11 जानेवारी रोजी 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विनोद तावडे बोलत होते. सध्या विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहे. राष्ट्रीय पातळीवर बरंच शिकायला मिळतं आणि इथं मी खूप खूश असल्याचं ते म्हणाले. भाजपची टीम सर्वसामान्यांना लक्षात येणार नाही असं काम करते. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची निवड अशातूनच झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मला 'ठाकरे ब्रँड' मान्य नाही, 'बाळासाहेब' हे एकमेक ब्रँड...
मला ठाकरे ब्रँड मान्य नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधीच्या दारात कधीच गेले नाहीत. बाळासाहेब दिल्लीत कधीच गेले नाहीत. ते एकदाच शरद पवारांकडे गेले होते. तेही झोपडपट्टीवासियांचा प्रश्न घेऊन दिल्लीला गेले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत विनोद तावडे म्हणाले, आम्हाला उद्धव ठाकरेंचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे या युतीत राज ठाकरेंचं म्हणणं कुणी ऐकून घेणार नाही. निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे सर्व कंट्रोल करतील. राज ठाकरेंना काहीच महत्त्व राहणार नाही. एकत्र आला होता तर उद्धव ठाकरेंनी मनसेला समान जागा द्यायल्या हव्या होत्या. उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा असला तरी राज ठाकरेंवर जनतेचा विश्वास जास्त आहे, असं म्हणत विनोद तावडेंनी ठाकरेंच्या युतीबाबत वक्तव्य केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
