'नांदगाव मतदारसंघात कांदेंची दहशत', छगन भुजबळांचा थेट आरोप, पुतण्याच्या 'DNA' वर स्पष्टीकरण

छगन भुजबळ यांनी NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' कार्यक्रमात बोलताना समीर भुजबळांवरील वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Chagan Bhujbal in NDTV Marathi Conclave :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. त्यानंतर सर्व पुतण्यांचे DNA सारखेच' या आशायाचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. छगन भुजबळ यांनी NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमात बोलताना या विषयावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सगळ्या पुतण्यांचे DNA सारखे हे भुजबळांचं विधान चांगलंच गाजलं. मी ते विधान टीका करण्यासाठी केलं नव्हतं. ते स्वतंत्र पद्धतीनं विचार करु शकतात. स्वतंत्र पद्धतीनं चालतात, इतकाच त्याचा अर्थ होतो, असं भुजबळ यांनी सांगितलं.  समीर भुजबळ खासदार होते. मी आमदार आहे, मंत्री आहे. पंकज भुजबळ दहा विधानसभेत आमदार होते. आता विधानपरिषदेत आहेत. तेथील (नांदगाव) परिस्थिती फार विचित्र आहे. दहशतीचं वातावरण प्रचंड आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वाधिक दहशतीचं वातावरण त्या मतदारसंघात आहे. कुणी बोलू शकत नाही, असा आरोप भुजबळ यांनी केला. 

ते सर्वांना त्रास देतात. भाजपा, काँग्रेस, आम्हाला त्रास देतात. आमच्या प्रत्येक केसमध्ये अपील करतो हे त्यांनीच सांगितलं. त्यांनी हे अपील दोन दिवसांमध्ये केलेलं नाही. आम्ही यापूर्वी महाविकास आघाडीत एकत्र होतो. आता महायुतीमध्ये एकत्र आहोत. सर्वांना त्रास देणे, हे त्यांचं धोरण आहे. त्यामध्ये आम्ही देखील आहोत. आमच्या त्रासाचं बघायला वकील आहेत. तेथील लोकांना शिवभोजन सुद्धा नाही. रेशनकार्डही नाही. लोकांना जाऊन विचारा NDC बँकेत काय झालंय जिल्हा बँकेत काय झालंय. लोक दहशतीला घाबरतात, पण ते मतदानाला जातील त्यावेळी तिथं सर्व दहशत झुगारुन मतदान करणार हे मी तुम्हाला निश्चित सांगतो, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. 

( नक्की वाचा : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र )

कांदे यांनी अपक्ष म्हणून येवल्यात फॉर्म घेतला आहे. मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं मनापासून स्वागत करतो. लोकशाही आहे. मी त्यांना काहीही वाईट बोलणार नाही.  त्यांनी कुणालाही पाठवावावं. त्याची काही चिंता करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितला.