NDTV Poll of Polls : देशात पुन्हा 'मोदी सरकार'?, एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं

Lok Sabha Elections 2024 Exit Poll : एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्सनुसार, मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने 'अब की 400 पार'चा जो नारा दिला होता, त्यापासून ते काहीसे दूर राहत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Lok Sabha Elections 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालं आहे. येत्या 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधी अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले आहेत. या सर्व एक्झिट पोलच्या आकड्यांची सरासरी काढून एनडीटीव्हीने पोल ऑफ पोल्स जाहीर केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्सनुसार, मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने 'अब की 400 पार'चा जो नारा दिला होता, त्यापासून ते काहीसे दूर राहत आहेत. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी मतदान पार पडलं. बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. पोल ऑफ पोल्सच्या आकडेवारीनुसार एनडीएला 361 जागा, इंडिया आघाडीला 145 जागा आणि 37 जागांवर इतर जिंकण्याची शक्यता आहे. म्हणजेच एनडीए बहुमताने केंंद्रात आपली सत्ता स्थापन करु शकते. 

(नक्की वाचा- Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं)

Exit Poll

इंडिया न्यूज डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए 371, इंडिया आघाडी 125 आणि इतरांना 47 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जन की बातच्या एक्झिट पोलनुसार, 362 ते 392 जागा, इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा आणि इतर 10 ते 20 जागांवर जिंकू शकतात. 

(नक्की वाचा - Exit Polls : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे?)

रिपब्लिक भारत मेट्रिजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 353 ते 368 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडी 118 ते 133 जागांवर तर इतर 43 ते 48 जागांवर जिंकण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्ही पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला  359, इंडिया आघाडीला 154 आणि इतरांना 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Advertisement

Exit Poll

देनिक भास्करच्या एक्जिट पोलनुसार, एनडीए 353 ते 368, इंडिया आघाडी 145 ते 201, इतर 33 ते  49 जागांवर विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार एनडीएल 342 ते 378, इंडिया आघाडी 153 ते 169, तर इतर 21 ते 23 जागांवर जिंकण्याचा अंदाज आहे. इंडिया न्यूज- पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, एनडीए 371, इंडिया आघाडी 125 तर इतरांना 47 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

इंडिया टीव्ही CNXच्या आकडेवारीनुसार एनडीए 371 ते 401 जागा जिंकू शकते. तर इंडिया आघाडी 109 ते 139 जागा, तर इतर 28-38 जागांवर विजयी होऊ शकतात. 

Advertisement