ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांची गाडी ही फोडण्यात आली आहे. हा हल्ला मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी इथं ही घटना घडली आहे. लोहा मतदार संघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. प्रचार सभा आटपून ते परतत होते. त्यावेळी हा हल्ला झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राध्यापक लक्ष्मण हाके त्यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी इथे हा प्रकार घडला. लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. प्रचार सभा संपल्यानंतर ते पतत होते. त्यावेळी असंख्य मराठा आंदोलक रस्त्यावर जमले होते. त्यांनी हाके यांची गाडी अडवल्याचा आरोप होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?
गाडी अडवल्यानंतर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. त्यांनी ही घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. तर ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शमवला.
ट्रेंडिंग बातमी - 'मविआचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे...' फडणवीस थेट बोलले
मात्र या गडबडीत लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड मराठा आंदोलनकांनी केल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळत चालला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा आणखी चिखळण्याची शक्यता आहे. सध्या मनोज जरांगे पाटीलही मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे याघटनेनंतर ते काय प्रतिक्राया देतात ते पाहावे लागेल.